कैलास भानुदास दळवी (४० रा. मालेवाडी ता. अंबड) असे मयताचे नाव आहे. मालेवाडी येथील कैलास दळवी हे मुलगी आरती कैलास दळवी (११), साडूचा मुलगा अथर्व रमेश खैरे (७) यांना घेऊन रविवारी दुपारी दुचाकीवरून (क्र. एम. एच. १०- बी.ए. १५९३) बोरगाव (ता. भोकरदन) येथे भाच्चीच्या लग्नासाठी जात होते. बाणेगाव पाटीजवळ दुचाकी व टेम्पोचा (क्र. एम. एच. ०४ - एफ. पी. ६४८६) अपघात झाला. या अपघातात कैलास दळवी हे गंभीर जखमी झाले. तर अथर्व व आरती यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शिवाजी देशमुख, पोलीस नाईक गणेश मांटे, संतोष वाढेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालन्याला नेण्यात आले होते; मात्र उपचारा दरम्यान सोमवारी सकाळी कैलास दळवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले होते. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
अपघातात एक जण ठार; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST