शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या शिबिरात दीड हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:33 IST

१५ फेब्रुवारी रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया व माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जालना : येथील बगडिया हॉटेलमध्ये १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया व माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.माजी आ. जेथलिया म्हणाले की, या शिबिरास राज्य प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नाना पटोले, खा. राजीव सातव, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह सर्व आघाड्यांचे प्रदेशाध्यक्ष तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबीर हे शिस्तबध्द पध्दतीने करण्याचा पक्षाचा प्रयत्न असून या शिबिरात पक्षाचे आजी- माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, पक्षाचे प्रदेश, विभाग, जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील सर्व आघाड्यांचे आजी - माजी पदाधिकारी तसेच पक्षाचे आजी- माजी नगरसेवक, जि. प. पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याचे जेथलिया यांनी सांगितले. माजी आ. गोरंट्याल म्हणाले की, या शिबिराच्या निमित्ताने एक दिवस अगोदर पक्षाचे नेते मंडळी जालना शहरात दाखल होणार असून शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, सी.ए. यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या शिबिरात लोकसभा, विधानसभेचे संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असून नेते मंडळी उमेदवारांविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणार आहेत. प्रदेश सचिव विजय कामड म्हणाले की, पक्षात असलेल्या परंतु नेते मंडळींशी समन्वय नसल्याने दुरावलेल्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या शिबिराच्या निमित्ताने पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या वेळी प्रा. सत्संग मुंडे, राम सावंत, राजेंद्र राख, समाज कल्याण सभापती दत्तात्रय बनसोडे, मंठा तालुकाध्यक्ष किसनराव मोरे, शेख महेमूद आदींची उपस्थिती होती.