जालना : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाºया पूर्व परीक्षेची जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. रविवारी होणा-या या परीक्षेसाठी जालना जिल्ह्यातून जवळपास दीड हजार परीक्षार्थी बसले असून, त्यांची पाच परीक्षा केंद्रावर व्यवस्था केली आहे. या परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, परीक्षार्थीची बायोमेट्रीक हजेरी घेण्यात येणार आहे.जालना शहरातील सरस्वती भुवन हायस्कूल, सीटीएमके विद्यालय, महावीर स्थानकवासी जैन विद्यालय - इंग्रजी तसेच एम.एस.जैन विद्यालय शिवाजी पुतळा, जिल्हा परिषद मुलींची शाळा या पाच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या आसनाची व्यवस्था केली आहे.सकाळी दहा ते दुपारी बारा यावेळेत ही परीक्षा होणार आहे. त्यात विविध विभागातील वर्ग दोनसाठी ही परीक्षा होत आहे. त्यात सेल्स टॅक्स आॅफिसरसह अन्य पदांचा समावेश आहे. ही परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून यंदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दक्षता घेतली आहे.प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडतांना देखील अत्यंत कडक तपासणी करण्यात येणार आहे. यासह भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून, राज्य सेवा आयोगाचे पथकही या परीक्षावर बारकाईने नजर राहणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली.
एमपीएससी परीक्षेसाठी दीड हजार परीक्षार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:21 IST
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाºया पूर्व परीक्षेची जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. रविवारी होणा-या या परीक्षेसाठी जालना जिल्ह्यातून जवळपास दीड हजार परीक्षार्थी बसले असून, त्यांची पाच परीक्षा केंद्रावर व्यवस्था केली आहे.
एमपीएससी परीक्षेसाठी दीड हजार परीक्षार्थी
ठळक मुद्देपाच केंद्रावर व्यवस्था : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर, भरारी पथकही केले स्थापन