शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 17:24 IST

Rajesh Tope on omicron variant : ओमायक्राॅनची काळजी म्हणून निर्बंध, वेगळा अर्थ काढू नका

औरंगाबाद : राज्यात ओमायक्राॅन ( omicron variant ) रुग्णांची संख्या शंभराच्या जवळपास पोहचली आहे. ओमायक्राॅनच्या प्रसाराला गती आहे, परंतु भीती बाळगायची गरज नाही, अशी स्पष्टोक्ती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on omicron variant ) यांनी दिली. तसेच दिवसाला ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल तेव्हा राज्यात लॉकडाऊन ( Lockdown in Maharashtra ) लागू होईल, अशी शक्यता मंत्री टोपे यांनी ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले नवे नियम आणि निर्बंधांची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

लग्न समारंभ, नवीन वर्ष, ख्रिसमस मध्ये गर्दी होऊ नये म्हणून राज्य शासनाने ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून नवे नियम आणि निर्बंध लावले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ओमायक्राॅनच्या प्रसारात गती आहे पण भिती बाळगायची गरज नाही. यात मृत्यू जरी नसले तरी काळजी घ्यायला हवी. यासाठीच सण, नवीन वर्षाचे स्वागत निर्बंध पाळून करावेत, असे आवाहन ही यावेळी मंत्री टोपे यांनी केले. 

तर तिसरी लाट ओमायक्राॅनची असेल ओमायक्राॅनच्या रुग्णांचा हजाराचा आकडा दुप्पट झाला तर त्याच्या प्रसाराची गती वाढते. सध्या राज्यात ओमायक्राॅनच्या रुग्ण संख्येचा आकडा १०० च्या जवळ गेला आहे. तिसरी लाट आली तर ती ओमायक्राॅनची राहील, अशी शक्यता टोपे यांनी व्यक्त केली. तसेच राज्यात ऑक्सिजनची गरज 800 मेट्रिक टन ऐवढी होईल तेव्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मात्र, ओमायक्राॅनच्या संसर्गात रुग्णास ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती देखील यावेळी टोपे यांनी दिली. 

निर्बंधांचा वेगळा अर्थ घेऊ नयेतसेच सर्वांनी सतर्कता बाळगावी, सध्या लागू नियम आणि निर्बंध काळजी म्हणून लावले आहेत. याचा वेगळा अर्थ घेऊ नये. एका वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून ही नियमावली आहे. राज्यात शाळा,हॉटेल ,रेस्टॉरंट पहिल्या सारखेच सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेOmicron Variantओमायक्रॉनJalanaजालना