शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

घर कोसळून वृद्ध महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:45 IST

एकमजली घर कोसळल्यामुळे ढिगा-याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शहरातील राजेंद्रप्रसाद रोडवर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकमजली घर कोसळल्यामुळे ढिगा-याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शहरातील राजेंद्रप्रसाद रोडवर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.पोलीस सूत्रांनी सांगितले, की नवीन जालन्यातील आरपी रोडवर बालकृष्ण उत्तमराव कुलकर्णी यांचे एकमजली जुने घर आहे. बालकृष्ण कुलकर्णी कामानिमित्त बाहेर होते. घरात त्यांची वृद्ध आई सुशीला उत्तमराव कुलकर्णी (८७) या एकट्याच होत्या.दुपारीचारच्या सुमारास ही एकमजली इमारत अचानक कोसळली. त्यामुळे सुशीला कुलकर्णी या विटा-मातीच्या ढिगा-याखाली गाडल्या गेल्या. स्थानिकांनी तात्काळ पोलीस व अग्निशमन दलास माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, रमेश रुपेकर, परदेशी यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. दोन जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा दीड तासात मातीचा ढिगारा हटविण्यात आला. तेव्हा सुशीला कुलकर्णी या मातीखाली दबल्याचे आढळून आले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नवीन व जुना जालना भागात जुन्या जीर्ण झालेल्या इमारतींची संख्या अधिक आहे. यातील अनेक इमारती कालबाह्य झाल्या आहे. नगरपालिका पावासळ्यात या इमारत मालकांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता पूर्ण करते. प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने इमारत मालकही याकडे दुर्लक्ष करतात. आजच्या घटनेनंतर तरी या प्रकाराक डे पालिका प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावी, अशी मागणी होत आहे.