हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात वाढत्या वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसर भकास झाला आहे. वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षी लावलेली रोपेही संगोपनाअभावी जळून गेलेल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे.हसनाबाद हे निजाम काळापासूनची जुनी मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. निजामकाळात परिसरात अनेक मोठ्या वृक्षाची लागवड करण्यात आली होती.सांस्कृतीक वारसा जपण्यासोबतच ग्रामस्थांनी अनेक वर्ष वृक्षाची जोपासना केली होती. काळ बदलत गेल्याने विकासाच्या नावावर डेरेदार वृक्ष तोडण्याचा सपाटाच सुरु केला आहे. यामुळे हसनाबाद गावात बोटावर मोजण्या ऐवढीच झाडे शिल्लक राहिले आहेत. यामुळे परिसरात झाडांची सावली शोधूनही सापडणार नाही. आता केवळ बाभळीची झाडे दिसतात.वृक्षतोडीकडे मात्र प्रशासन, वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.
अवैध वृक्षतोडीमुळे परिसर होतोय भकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:30 IST
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात वाढत्या वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसर भकास झाला आहे.
अवैध वृक्षतोडीमुळे परिसर होतोय भकास
ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : वृक्षलागवड मोहिमेचा फज्जा