जिल्हा आरोग्य प्रशासनास शुक्रवारी २,४२८ जणांच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट ०.२५ वर गेला आहे. २,३७६ आरटीपीसीआर तपासणीतच हे सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये जालना शहरातील एकाचा समावेश आहे. मंठा शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अंबड शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालात समोर आले आहे. तर परभणी जिल्ह्यातील एकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, संस्थात्मक अलगीकरणात १८ जणांवर उपचार सुरू आहेत. यात जालना शहरातील राज्य राखीव पोलीस बल सी ब्लॉकमध्ये चार जणांवर तर अंबड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अलगीकरणात १४ जणांवर उपचार सुरू आहेत.
चौकट
जिल्ह्यात १२४ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात १२४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काहींवर रुग्णालयात तर काहींवर अलगीकरणात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१,६३९ वर गेली असून, त्यातील १,१८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६०,३३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.