शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या लेटलतीफ कर्मचा-यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:49 IST

नगरपालिकेत १३ लेटलतीफ कर्मचा-यांना सोमवारी अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांनी कारणे दाखवा नोेटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिकेत १३ लेटलतीफ कर्मचा-यांना सोमवारी अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांनी कारणे दाखवा नोेटीस बजावली आहे. बायोमेट्रिक मशीन बंद असल्याने नगरपालिका कर्मचा-यांचा मनमानी कारभार सुरू असून, अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित केले होते. याची दखल घेत उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी पालिका कार्यालयात सोमवारी सकाळी अचानक विविध विभागांची झाडाझडती घेतली. राऊत यांनी मुख्याधिका-यांना सूचना केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.जालना नगर पालिका कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद असल्यामुळे कर्मचारी सकाळी उशिरा कार्यालयात येतात. तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच निघून जातात. या विषयीचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल घेत उपनगराध्यक्ष राजेश राऊत सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता पालिका कार्यालयात पोहोचले. अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांना सोबत घेऊन राऊत यांनी आस्थापना विभाग, पाणीपुरवठा विभाग, मालमत्ता विभाग, कर विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभागात जाऊन प्रत्यक्ष अचानक पाहणी केली. या वेळी तब्बल १३ कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आले. गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा देऊन त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची सूचना राऊत यांनी कानपुडे यांना दिली. तसेच या पुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी सर्व कर्मचा-यांना वेळेत कार्यालयात हजर राहण्याबाबत ताकीद देण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, पालिकेत लवकरच बायोमेट्रिक कार्यान्वित करून त्यावर कर्मचा-यांच्या हजेरीची नोंद केली जाईल, अशी ग्वाही अतिरिक्त मुख्याधिकारी कानपुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.