शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग

By विजय मुंडे  | Updated: July 20, 2024 19:55 IST

पिंपळगाव शेरमुलकी : दरवाजा जळाला, कार्यालयातील कागदपत्रे बचावली

भोकरदन (जि.जालना) : शेताकडे जाणारा रस्ता तयार करावा, अशी मागणी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने पिंपळगाव शेरमुलकी (ता. भोकरदन) येथील संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी चक्क ग्रामपंचायतीलाच आग लावली. गावातील काहींनी धाव घेत आग विझविली. तोपर्यंत ग्रामपंचायतीचा दरवाजा जळाला होता. सुदैवाने आग अटोक्यात आल्याने कार्यालयातील कागदपत्रे मात्र बचावली.

पिंपळगाव शेरमुलकी गावापासून गव्हाळी शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. थोडाही पाऊस पडला की या मार्गावर चिखल होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी, महिलांना शेतात जाताना- येताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसल्याने संतप्त महिला, नागरिकांनी शुक्रवार, १९ जुलै रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान पिंपळगाव शेरमुलकी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप होते. संतप्त महिलांनी कोणताही विचार न करता थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजासमोर सरपण ठेवून आग लावली. त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मात्र, ही बाब लक्षात येताच गावातील काहींनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेत आग विझविली. तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या दरवाजाचा काही भाग जळून खाक झाला होता. सुदैवाने आग आटोक्यात आल्याने कार्यालयातील कागदपत्रे वाचली आहेत. या प्रकारानंतर सरपंच स्वाती राजेंद्र तांबे, ग्रामसेवक आण्णासाहेब जाधव यांनी शनिवार, २० जुलै रोजी हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून, सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात झाला नव्हता. दरम्यान, महिलांनी ग्रामपंचायतीला आग लावल्याच्या घटनेने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

महिलांनी दिल्या घोषणाआंदोलक महिलांनी गावातील आईच्या मंदिरापासून ते गव्हाळी शेताकडे जाणारा पाणंद रस्ता केलाच पाहिजे, ग्रामस्थांना पायाभूत सुविधा दिल्याच पाहिजे, अशा घोषणा देत ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरोधातही रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या.

 खोडसाळपणे, हेतुपुरस्सर हा प्रकार केलागावातील महिलांनी रस्त्याबाबत आमच्याकडे निवेदन दिलेले नाही किंवा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात येणार आहोत, याची साधी कल्पना सुद्धा दिलेली नाही. महिलांनी अचानकपणे येऊन ग्रामपंचायतीच्या दरवाजाला आग लावली. खोडसाळपणे, हेतुपुरस्सर हा प्रकार केला असून, आम्ही महिलांविरुद्ध हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.-स्वाती तांबे, सरपंच, पिंपळगाव शेरमुलकी 

टॅग्स :Jalanaजालनाgram panchayatग्राम पंचायत