शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जालना, घनसावंगीत राष्ट्रवादीचा हल्लोबाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:03 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जालन्यासह घनसावंगी येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

जालना/घनसावंगी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जालन्यासह घनसावंगी येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. आ. राजेश टोपे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतक-यासंह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.घनसावंगी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. या वेळी आ. राजेश टोपे, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळंके, माजी आ. चंद्रकांत दानवे, डॉ. निसार देशमुख, उत्तमराव पवार, महिला अध्यक्षा सुरेखा लहाने, सतीश टोपे, मनोज मरकड, रघुनाथ तौर, नगराध्यक्षा योजना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी बोलताना टोपे म्हणाले, की भाजप, शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. हा केवळ प्रातिनिधिक स्वरुपाचा मोर्चा असून, आगामी काळात संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बाळासाहेब जाधव, संभाजी देशमुख, काशीनाथ मते, रमेश पैैठणे, रवींद्र तौर, तात्यासाहेब चिमणे, श्याम मुकणे, जयमंगल जाधव, नकुल भालेकर, भाऊसाहेब कनके, सुदामराव मुकणे, पंडित धांडगे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोलराष्ट्रवादीच्या वतीने गुरुवारी चारच्या सुमारास जालना येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. कापसाला हमीभावावर ५०० रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दर जाहीर करावा, रबी पीकविमा आॅफलाईन स्वीकारावा, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शाहआलम खान, एकबाल पाशा, अब्दुल रशीद बबलू चौधरी आदींची उपस्थिती होती.