शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती : नुकसान भरपाईत ‘वर्गवारी’ हवीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:10 IST

फळबागांवर एकरी होणारा खर्च, भाजीपाला, बियाणे उत्पादन वा पारंपरिक पिकांसाठी लागणारी गुंतवणूक ही वेगवेगळी असते याचा विचार व्हायला हवा. त्यानुसारच भरपाई मिळाली तरच शेतक-यांना न्याय मिळू शकणार आहे. अन्यथा लाखांचा खर्च आणि हजारांच्या भरपाईने काही साध्य होण्याची चिन्हे नाहीत.

राजेश भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम वारंवार दिसून येत आहेत. बेमोसमी पाऊस, गारपीट इ. नैसर्गिक आपत्तींचे संकट राज्यासह जिल्ह्यावरही नव्याने येत आहेत. गारपिटीच्या घटनेने हे अधोरेखित झाले असून, फळबाग, भाजीपाला व पारंपरिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नैतिक जबाबदारी म्हणून शासनाने भरपाई देणे हे कर्तव्यच. मात्र, ती देताना फळबागांवर एकरी होणारा खर्च, भाजीपाला, बियाणे उत्पादन वा पारंपरिक पिकांसाठी लागणारी गुंतवणूक ही वेगवेगळी असते याचा विचार व्हायला हवा. त्यानुसारच भरपाई मिळाली तरच शेतक-यांना न्याय मिळू शकणार आहे. अन्यथा लाखांचा खर्च आणि हजारांच्या भरपाईने काही साध्य होण्याची चिन्हे नाहीत.विविध प्रकारच्या प्रदूषणांचे वाढते प्रमाण आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल यातून नैसर्गिक आपत्ती मानवी समूहांवर कोसळत आहेत. वादळी वारा, अवकाळी पाऊस, बेमोसमी पडणारा पाऊस गारपीट आदींमुळे शेतमालाची अपरिमित हानी होत आहे. अनेक महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके, बागा क्षणार्धात हातून जात असताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतक-यांसमोर येत आहे. त्यातच पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग. यामुळेही शेती हा आतबट्ट्याचाच व्यवसाय ठरत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.जिल्ह्यात कोरडवाहू जमीन जास्त असली तरी बागायती जमीनही दखलपात्र इतकी नक्कीच आहे. द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी इ. फळबागा जिल्ह्याच्या बहुतांश भागात काही वर्षांपासून शेतक-यांनी लावल्या आहेत. यात रात्रंदिवस मेहनत करुन फळबागा वाढविणे, जगवणे, रोगराईपासून दूर ठेवणे हे शेतक-यांपुढील मोठे आव्हान असते. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या संकटांनी तर शेतकरी कोलमडून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.एक एकर फळबागेसाठी जवळपास आठ लाखांचा खर्च येतो. कांदा, भाजीपाला इ. च्या बियाणे निर्मितीसाठी २ ते ३ लाखांचा खर्च येतो. तर पारंपरिक पिकांसाठी काही हजारांचा खर्च शेतक-यांना येत असतो. यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमाल व फळबागा हातच्या गेल्या, तर सरकार सरसकट आर्थिक मदत जाहीर करते. वस्तुत: फळबाग, भाजीपाला, बियाणे उत्पादन (शेडनेट) व पारंपरिक अशी वर्गवारी करुन सरकारने नुकसानीचे पंचनामे केल्यास शेतकºयांना निश्चितच न्याय मिळू शकेल.उत्पादन खर्चानुसार भरपाई मिळाली तर शेतक-यांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तपणे अशी मागणी रेटली तरच मायबाप सरकारकडून शेतक-यांना भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा करता येऊ शकेल. अन्यथा आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात शेतकरी उपेक्षित राहण्याची दाट शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर अडथळ्यांची शर्यत पार करुनही उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला नाही तर शेतक-यांनीकाय करावे, हे मायबाप सरकारने सांगावे.