शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अधिका-यांना मंदिरात कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:30 IST

कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलक शेतक-यांशी चर्चा करण्यास गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना ग्रामस्थांनी गावातील मारोती मंदिरात कोंडून टाकले

बदनापूर : कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलक शेतक-यांशी चर्चा करण्यास गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना ग्रामस्थांनी गावातील मारोती मंदिरात कोंडून टाकले. तालुक्यातील चनेगाव येथे शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.तालुक्यातील चनेगाव येथील कृषीपंपांचे वीजबिल थकल्यामुळे वीजपुरवठा एक डिसेंबरपासून खंडित आहे. याविषयी शेतकरी संघटनेने १६ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. राजूर-दाभाडी रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुपारी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. वीज भारनियमन कमी करावे, कृषिपंपांचा खंडित वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली. आंदोलक शेतक-यांची चर्चा करण्यासाठी दाभाडी येथील सहायक अभियंता अमरपाल खुशाल मून, आर. डी. पुंगळे, प्रदीप शेकळे, विजय दुधाने, विलास जाधव हे अन्य कर्मचा-यांसह चनेगाव येथे गेले. या वेळी शेतक-यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र अधिका-यांनी थकित बिलाचा भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अधिका-यांना गावातील मारोती मंदिरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घेतले.हा प्रकार समजल्यानंतर बदनापूर ठाण्याचे सहायक निरीक्षक बोलकर, कॉन्स्टेबल जॉन कसबे, एस. पी. चव्हाण हे गावात पोहोचले. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तासाभरानंतर अभियंत्यांना बाहेर काढले.दरम्यान, या प्रकरणी अमरपाल खुशाल मून यांनी दिलेल्या तक्रारीवरून निवृत्ती शेवाळे, नामदेव निहाळ, सदाशिव जायभाये, ढोरकूल, कृष्णा घुगे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या ५० ते ६० जणांवर बदनापूर ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला. कॉन्स्टेबल कसबे तपास करीत आहेत.