मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आदी घोषणा करण्यात आल्या. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे, चंद्रकला गवळी, सर्जेराव पाटोळे, गोपी घोडे, बाबासाहेब पाटोळे, रमेश दाभाडे, भास्करराव कांबळे, बळीराम गोफणे, रमेश पाटोळे, कमल भारसाकळे, रमाबाई डोईफोडे, अंबादास गायकवाड, प्रकाश खंडागळे, व्यंकटेश गोफणे, विलास लोखंडे, गुमान पारखे, सुखदेव पाटोळे, बाबासाहेब पाटोळे, भगवानराव पाटोळे, ज्ञानेश्वर शेंडगे आदींची उपस्थिती होती.
लहुजी साळवे क्रांती सेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST