परतूर : येथील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी येत्या दोन दिवसांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याने पोलीस ठाणे परिसर चकाचक करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मागील आठ दिवसांपासून यासाठी स्वच्छता मोहीम राबविणे सुरू होते. पूर्वी ठाण्याच्या इमारतीला अपघातातील वाहने, जप्त केलेली वाहने, चोरीचीसह इतर साहित्यांचा गराडा पडला होता. त्यामुळे पोलिसांनाच वाहने लावण्यासाठी येथे जागा शिल्लक नव्हती. असे असतानाच तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याने पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यात परिसर चकाचक दिसून येत आहे.
पोलीस ठाणे परिसरातील स्वच्छतेसाठी शिकाऊ पोलीस अधीक्षक गौर हसन, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक आंभुरे, सुनील बोडखे आदींनी प्रयत्न केले.
मालकांचे दुर्लक्ष
परतूर येथील पोलीस ठाण्यात चोरीसह अपघातातील वाहने मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे, यातील अनेक वाहने घेऊन जाण्याकडे वाहनमालकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात दिवसेंदिवस जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या वाढत आहे.