अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, युवा पिढीही व्यसनाधीन होत आहे, शिवाय तळीरामांचा नाहक त्रास महिला वर्गालाही सहन करावा लागत आहे. तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मसापच्या वतीने रेखा बैजल यांचा सत्कार
जालना : येथील ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांच्या ‘महावस्त्र’ या कादंबरीस अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण पुरस्कार व अखिल भारतीय प्रकाशन संस्थेचा प्रकाशकांना मिळणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद व आनंद फाउंडेशनच्या वतीने रेखा बैजल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.शिवाजी मदन, प्रा.रमेश भुतेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आनंद फाउंडेशनचे प्रा.संदीप पाटील, डॉ.प्रताप रामपुरे, डॉ.प्रतिभा श्रीपत, शिवकुमार बैजल, डॉ.दादासाहेब गिर्हे, डॉ.ज्योती धर्माधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.