शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात दूध संकलनाचे पुन्हा त्रांगडे; संस्था अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:35 IST

दूग्ध विकास विभागाकडून दूध सहकारी संस्थांना केवळ शंभर लीटरच दूध खरेदी करण्याचे निर्देश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचा मोठा फटका दूध संकलन करणाऱ्या सहकारी संस्थांना बसला आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील दूग्ध विकास विभागाकडून हे पत्र जालन्यातील दूध संकलन संस्थाना प्राप्त झाले आहे. यामुळे संस्थाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे१५ हजार लिटर दूध गेले वाया : शंभर लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दूग्ध विकास विभागाकडून दूध सहकारी संस्थांना केवळ शंभर लीटरच दूध खरेदी करण्याचे निर्देश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचा मोठा फटका दूध संकलन करणाऱ्या सहकारी संस्थांना बसला आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील दूग्ध विकास विभागाकडून हे पत्र जालन्यातील दूध संकलन संस्थाना प्राप्त झाले आहे. यामुळे संस्थाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.या संदर्भात दूग्ध विकास विभागाशी संपर्क केला असता. सध्या जालना येथील दूध शितीकरण केंद्राची क्षमता ही संकलन होत असलेल्या संपूर्ण दुधावर प्रक्रिया करणे शक्य नसल्याने दूध संकलन करणाºया सहकारी संस्थांना याचा फटका बसू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु अचानक हा असा तुघलकी निर्णय घेतल्याने अतिरिक्त दूध संकलनाचे करावे काय असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.दरम्यान या निर्णयामुळे यापूर्वी दुग्ध विकास विभागाने दूध अधिक काळ टिकावे म्हणून संस्थांना मोठी साठवण क्षमता असणारे फ्रीज दिले होते. या फ्रीजमध्ये आता केवळ शंभर लिटर दूध साठवायचे म्हटल्यास त्याचे वीजबिलही जास्त येणार आहे. त्यातच आता दूध उत्पादकांनी जे दूध नेहमीप्रमाणे आमच्या सहकार संस्थेकडे आणल्यास त्यांना परत पाठविण्याची वेळ संस्थाचालकांवर येत आहे. जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथून आलेले दूध गेल्या दोन दिवसांपासून परत पाठविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माहोरा केंद्राचे जवळपास १५ हजार लिटर दूध हे रस्त्यावर फेकून द्यावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना : भाव दोन रूपयांनी कमी झाल्याने नाराजीत वाढ४पूर्वी लिटरमागे २७ रूपये भाव मिळत होते. मात्र आता सरकारने या दरात दोन रूपयांची कपात केली आहे. यामुळे देखील दूध उत्पादकांमध्ये नारजी व्यक्त होत आहे. एकीकडे कधी नव्हे तेवढे दूधाचे संकलन वाढत असताना आता दूध संकलन आणि त्याच्या खरेदीवर बंधन घातल्याने शेतकरी हवादिल झाला आहे.

टॅग्स :Jalanaजालनाmilkदूध