शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:41 IST

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेऊन योजनांचा आढावा घेऊन, रखडलेल्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येत्या आठवड्यात विधासभेची आचारसंहिता घोषित होणार आहे. त्यापूर्वी सर्व लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी लगीनघाई करत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेऊन योजनांचा आढावा घेऊन, रखडलेल्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दक्षता समितीसह अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय विभाग, पाटबंधारेसह अन्य विभागांच्या योजनांचा आढावा दोन्ही मंत्र्यांनी अत्यंत बारकाईने घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना काही प्रश्नांची उत्तेरेही देता आली नाहीत, त्यामुळे पालकमंंत्री लोणीकर यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाकडून कुठल्याच योजनेला पैसे कमी पडत नसताना त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर शासनाची यातून बदनामी होते, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले.दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेताना अधिका-यांनी सांगितले की, उज्ज्वला गॅस योजनेतून जवळपास ९० हजार २४८ कुटुंबांना गॅसचे वाटप करण्यात आले असून, जवळपास तीन लाख ४१ हजार कुटुंबांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. धान्याचा काळाबाजार रोखण्यायसाठी जिल्ह्यातील एक हजार २०० स्वस्तधान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनव्दारेच धान्यवाटप केले जात असल्याचे सांगण्यात आले. यंदा कमी पाऊस लक्षात घेता टंचाईवर आतापासूनच नियंत्रण करण्याची गरज असल्याचे लोणीकर आणि राज्यमंत्री खोतकरांनी नमूद केले. आजच ग्रमीण भागातील पाणी टंचाईची स्थिती गंभीर असल्याचे सांगून, त्याचे नियोजन करण्याचे सांगितले.यावेळी जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांचा आढावा अभियंता कडलक यांनी सांगितला. समाज कल्याण विभागाचे एकूण ११ वसतिगृहे असून, त्यातील विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. अल्पसंख्याक विभागाकडूनही आढावा घेण्यात आला.यावेळी सेवलीसह घनसावंगी आणि अन्य गावांमध्ये या विभागाने ५० लाख रूपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. तसेच झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरणाच्या योजनेचा आढावा घेण्यात आला. योवळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह अन्य विभागाप्रमुखांची उपस्थिती होती.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरArjun Khotkarअर्जुन खोतकर