शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

'आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे', मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू

By विजय मुंडे  | Updated: January 25, 2025 11:36 IST

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू

जालना : मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे शनिवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सगेसोयरेचा अध्यादेश काढून २६ जानेवारी रोजी एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणत्र देण्याचा जीआर काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना मिळालेल्या सागेसोयऱ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, न्या. शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ द्याची, प्रमाणपत्र वाटपासाठी कक्ष सुरू करावे, शिंदे समितीला उर्दू, फारशी, मोडीलिपीचे अभ्यासक द्यावेत, ज्यांच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलेले नाही त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. हैदराबाद संस्थानचे गॅझेट, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी द्यासंतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या सर्व आरोपितांना फाशीची शिक्षा व्हावी, गुंडगिरीचा नायनाट करावा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सर्व मागणीही पूर्ण कराव्यात. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आपण लढा देणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना