तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली टेंभी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मालन जवकर, तर उपसरपंचपदी युवा नेते महेश कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय राजेश्वर कोल्हे पाटील ग्रामविकास पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक स्वर्गीय राजेश्वर कोल्हे यांची ३५ वर्षापासून एक हाती सत्ता होती. तीच पुढे त्यांचे चिरंजीव महेश कोल्हे यांनी कायम टिकून ठेवली. गुरुवारी सरपंचपदाच्या निवडणुकीत मालन जवकर यांची सरपंचपदी, तर महेश कोल्हे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित गफार कुरेशी, बापूसाहेब बोंडारे, लक्ष्मण शिंदे, गंगाराम कांबळे, बाळू माळी, सावित्र आस्कंद, नसरीन सिद्दिकी, गुंफाबाई पाटोळे, मीना काटकर, नंदा मोताळे यांची उपस्थिती होती. या निवडीचे पालकमंत्री राजेश टोपे, सागरचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, जि. प. उपाध्यक्ष महेंद्र पवार, श्यामराव मुकणे, मुकुंद कोल्हे, धनंजय कोल्हे, जयमंगल जाधव, रणजितसिंग उढाण, मुरली असकंद, पाराजी आस्कंद, कुंडलिक पाटोळे, साहेबराव कांबळे, संदीप शर्मा, भारत असकंद, नानाभाऊ नळगे, रशीद हवालदार, जवूर पाशा, बाबू रतन साब, राजू कांबळे, शिवराम घायतडक, श्रीराम बोंडारे, अरुण नन्नवरे, महादेव भिलारे, सुभाष काटकर, नीलेश जवकर आदींनी स्वागत केले.