शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माहूरच्या रोप-वेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:31 IST

श्रीक्षेत्र माहूर (जि. जालना) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर दर्शनासाठी लवकरच रोप-वेवरून जाण्याचा योग येणार आहे. 

नितेश बनसोडे श्रीक्षेत्र माहूर (जि. जालना) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर दर्शनासाठी लवकरच रोप-वेवरून जाण्याचा योग येणार आहे. प्रस्तावित रोपवेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुकादेवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली़माहूर तीर्थक्षेत्राच्या विविध मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, यासाठी श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, आशिष जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली़ माहूर तीर्थक्षेत्र विकासाचा सुधारित २१६ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे़ त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे़ पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत़पहिल्या टप्प्यातील ६८ कोटींपैकी आजवर केवळ २ कोटी निधी प्राप्त झाला आहे़ सर्व अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आले आहेत़ अंदाजपत्रकास मंजुरी देवून तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली़ तसेच भाविकांचा वाढता ओघ पाहता रोपवेचे कामही तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली़मुख्य दर्शनद्वारही होणार मोठेभाविकांना श्री रेणुकादेवीचे दर्शन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी देवीच्या गाभाºयाचे मुख्य दर्शनद्वार मोठे करण्याची आवश्यकता आहे़ पुरातत्त्व विभागाने त्यांच्या यंत्रणेमार्फत काम करण्यात येईल व अंदाजपत्रकाप्रमाणे १ कोटी २७ लाख रुपये संस्थानने पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करावेत, असे कळविले होते़ दर्शनद्वारासाठी सांस्कृतिक मंत्रालय १ कोटी २७ लाख रुपये लवकरच पर्यटन मंत्रालयाकडे वर्ग करणार आहे, अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी दिली़