शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी महात्मा गांधी अध्ययन केंद्राला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:57 IST

जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. सद्य:स्थितीत जेईएस महाविद्यालयाचे व्यवस्थापन खिशातून पैसे खर्च करून केंद्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु हे किती दिवस चालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. म.गांधींच्या विचारांचा प्रसार अडचणीत आला आहे.देशातील विविध थोर विचारवंताचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने ही अध्ययन केंद्र स्थापन केली होती. त्यात जालन्यात महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जेईएस महाविद्यालयाने हे केंद्र सुरू केले होते. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १४ राज्यस्तीय युवक-युवतींचे शिबिरांचे आयोजन केले होते. प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह अनेक दिग्गज विचारवंतांनी जालन्यात हजेरी लावून युवकांना मार्गदर्शन केले होते. दरम्यान महात्मा गांधीचे विचार हे विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी या केंद्राकडून एक स्वतंत्र परीक्षा घेतली जात होती. ही परीक्षा जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. एकूणच मोठी ग्रंथ संपदा असलेले वाचनालय या केंद्रात आहे. या केंद्राच्या माध्यमातून गावाकडे चला या अंतर्गत सेद्रिंय शेती तसेच विशेष स्वच्छता अभियान राबविले आहे. या केंद्राला २००६ पासून दरवर्षी सात लाख रूपयांचा निधी मिळत होता. तो आता तीनवर्षापासून बंद झाला आहे. एकीकडे महात्मा गांधीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे दाखवत असले तरी वास्तव मात्र, वेगळेच आहे. या केंद्राला निधी देण्याचा मुद्दा हा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे जेईएस महाविद्यालच्या हिरक महोत्सची कार्यक्रमाच्या शुभारंभास आले असता, त्यांच्याही लक्षात आणून देण्यात आला होता. मात्र त्यांनीही याकडे ऐकून न एैकल्या सारखे केल्याचे दिसून येते. सर्वात मोठे दर्दैव म्हणजे हे केंद्र नेमके महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती वर्षात आर्थिक कोंडीत सापडले आहे. हे केंद्र भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबवू शकते. परंतू, केंद्र चालविण्यासाठी निधीची नितांत गरज आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीEducation Sectorशिक्षण क्षेत्र