शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चारशे गावांत ‘महादूध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:02 IST

पशुधनाची उत्पादकता वाढविणे, उत्पादित दुधाचे योग्य पद्धतीने संकलन, विपणन करून शेतक-यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महादूध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४०१ गावांची निवड झाली

बाबासाहेब म्हस्के/जालना : पशुधनाची उत्पादकता वाढविणे, उत्पादित दुधाचे योग्य पद्धतीने संकलन, विपणन करून शेतक-यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महादूध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४०१ गावांची निवड झाली असून, या माध्यमातून विविध उपक्रम गाव पातळीवर राबविण्यास सुरुवात झाली आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यशासन आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून मराठवाडा आणि विदर्भातील ११ जिल्ह्यात दुध उत्पादन वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यांचा यात समावेश आहे.महादूध प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर दूध उत्पादन वाढविण्यासाठी पशुपालकांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. शेतक-यांना गायी, म्हशींसाठी गाव पातळीवर कृत्रिम रेतन सुविधा पुरविणे, दुध देणाºया पशुंना संतुलित आहार मिळावा यासाठी २५ टक्के अनुदानावर गुणवत्तापूर्व पशुखाद्य पुरविणे, गोचिड, गोमाशा निर्मुलन, वंध्यत्त्व निदान व उपचार शिबिरे घेणे, योग्य वेळी जनावरांना लसीकरण करणे, वैरण विकास कार्यक्रमांतर्गत बहुवार्षिक वैरण पिकांची लागवड करणे, अनुदान तत्त्वावर पूरक पशुखाद्य, कडबाकुट्टी यंत्र उपलब्ध करून देणे आदी सुविधा दुग्ध उत्पादन करणाºया पशुपालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये पशुपालकांनी शिबिरे घेऊन त्यांना माहिती देणे, गाव पातळीवर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, योजनेबाबत विविध पातळ्यांवर जनजागृती करणे इ. उपक्रम सध्या राबविण्यात येत आहे. महादूध प्रकल्पांतर्गत पुशपालकांना अनुदानवर देण्यात येणाºया लाभाची रक्कम थेट पशुपालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डी. बी. कुरेवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.