शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

बियाणे विक्रीवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:39 IST

यंदाचा खरीप हंगाम दोन महिन्यांवर आलेला आहे. बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा फसवणूक होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखरिपासाठी दक्षता : सावधान, बोगस बियाण्यांचा बाजारात शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा खरीप हंगाम दोन महिन्यांवर आलेला आहे. बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा फसवणूक होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.गुणवत्ता व दजार्ची हमी देणाºया अधिकृत विक्रेत्याकडून कृषी निविष्ठांची खरेदी करावी. बनावट व भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावीे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीट सीलबंद-मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घेणे आवश्यक आहे. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास तक्रारीसाठी जवळच्या कृषी अधिकारी किंवा कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. या खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची पेरणी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बाजारात विविध कंपन्यांचे सत्यतादर्शक बियाणे विक्रीला उपलब्ध राहण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी खरेदी करतेवेळी अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच खरेदी करून रितसर पावती घ्यावी. सोयाबीन पेरणीकरिता आपले स्वत:चे घरच्या बियाण्याची घरीच उगवणशक्ती तपासून खात्री करावी. बियाण्याच्या बाबतीत गाव पातळीवर कुठल्याही अनाधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषी निविष्ठा खरेदी करु नये, याद्वारे फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे, असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.बेकायदेशीर बियाण्यांमुळे कारवाईस समस्याबाजारात राऊंडअप बीटी, एचटी बीटी, बीजी-३ अशा प्रकारच्या कापूस बियाण्याची खाजगी व्यक्तींमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याची चर्चा आहे. केंद्र शासनाने कोणत्याही कंपनीस तणनाशक प्रतिकारक्षम जनुकीय कापूस बियाणे विक्रीची परवानगी दिलेली नाही. अनधिकृत मार्गाने खरेदी केलेले जनुकीय बियाणे पर्यावरण कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईस पात्र ठरत असल्याने अशा बियाण्याची लागवड शेतकऱ्यांसाठी पुढे कायदेशीर समस्या निर्माण करू शकते.बीटीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह नसावा; कृषी विभागाचे आवाहनशेतकऱ्यांनी विशिष्ट बीटी कपाशी वाणाचा आग्रह धरू नये. सर्वच बीटी कपाशी उत्पादनक्षमता सारखीच आहे. त्यासाठी योग्य मशागतीच्या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. रासायनिक खताच्या किमतीमध्ये वेळोवेळी बदल होत असल्याने बॅगवरील छापील किमतीपेक्षा जास्त किमतीत रासायनिक खत विकत घेऊ नये. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीजवळून गावपातळीवर दुय्यम मूलद्रव्ये, बिगर नोंदणीकृत सूक्ष्म मूलद्रव्ये, पीकवाढ संजीवके, जैविक कीटकनाशके इत्यादी प्रकारची उत्पादने खरेदी करू नये.