शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

विकासाच्या मुद्यावर ‘लोकमत’ची भक्कम साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:09 IST

राज्यातील विकासाच्या मुद्यांवर लोकमतने नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन भरीव योगदान दिले आहे. याच भूमिकेतून गाव विकासाचे उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तृत्ववान सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित लोकमत सरपंच अवार्ड सोहळा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

जालना : राज्यातील विकासाच्या मुद्यांवर लोकमतने नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन भरीव योगदान दिले आहे. याच भूमिकेतून गाव विकासाचे उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तृत्ववान सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित लोकमत सरपंच अवार्ड सोहळा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. येथील मातोश्री लॉनवर गुरुवारी आयोजित ‘लोकमत सरपंच अवॉर्ड २०१८ ’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते.व्यासपीठावर पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, बीकेटी टार्यसचे जुबेर शेख, विभाग व्यवस्थापक नेत्रानंद आंबडेकर, महिंद्रा ट्रॅक्टरचे जालना येथील डीलर अंबरीश लाहोटी, विभागीय अधिकारी सचिन नवले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर यांची उपस्थिती होती.अत्यंत उत्साहाच्या वातावरणात डोक्यावर फेटा बांधून तुतारीच्या निनादात १३ सरपंचांनी मान्यवरांच्या हस्ते विविध कार्यांसाठी दिलेले हे पुरस्कार स्वीकारले. बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्याचे प्रायोजक पतंजली आयुर्वेद तर सहप्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर्स होते.जिल्हाभरातून उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना लोणीकर म्हणाले, की गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक सरपंच धडपडत असतो. विकासाची कुठलीही योजना लोकसहभागाशिवाय अशक्य आहे. त्यामुळे केंद्र व राज्यशासनाच्या योजना समजावून घेत सरपंचांनी विविध योजनांमधून प्राप्त निधीतून आपल्या गावाचा कायापालट करण्यावर भर द्यावा. लोकमत वृत्तपत्र महाराष्ट्रातील समाजमनाचा आरसा बनले आहे. जलसंधारण, स्वच्छता, ग्रामविकास, ऊर्जा या विषयांवर लोकमतने सातत्याने विचारमंथन करून त्याद्वारे सरकारला दिशा देण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. लोकमत आयोजित ऊर्जा समिटचा लोणीकरांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच मुंबईत पाणीपरिषद घेऊन दुष्काळाच्या संदर्भात तज्ज्ञांची चर्चा घडवून आणली. आपल्या सरपंच ते मंत्रीपदापर्यंतच्या वाटचालीतील अनेक किस्सेही त्यांनी नवोदित सरपंचांना सांगितले. प्रास्ताविकात लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी लोकमत सरपंच अवॉर्ड आयोजनामागील भूमिका मांडली. वृत्तपत्र म्हणून सामाजिक बांधिलकी जपताना ग्रामविकासाचे चांगले काम करणाºया सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि ज्यांचे कौतुक झाले त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन इतर गावांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. जिल्हाभरातून प्राप्त अनेक प्रस्तावांमधून परीक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवर चांगले काम करणा-या सरपंचांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत, त्यांनी पुढील वर्षाकरिता अधिक जोमाने काम करून सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, असे महाजन यांनी आवर्जून सांगितले. पुरस्कार परीक्षक कमिटीचे सदस्य कृषीभूषण उद्धवराव खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. गावातील पायाभूत सुविधांचा पुरस्कार प्राप्त तरुण सरपंच सचिन गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. नीता पानसरे-वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.आता काम करण्याचे दिवस - राज्यमंत्री अर्जुन खोतकरपूर्वीची आणि आताची राजकीय परिस्थिती बदलली आहे. सरपंच होणे आता सोपे राहिलेले नाही. त्यामुळे सरपंच म्हणून झालेली निवड सार्थकी लावण्यासाठी प्रत्येकाला आता काम केल्याशिवाय पर्याय नाही. सरकार कुठले असेल तरी लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सरपंचांनी विकासाच्या भूमिकेतून करावे. गावातील चुकीच्या गोष्टींना पायबंद घालून सरपंचांनी रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञानाचा वापर, जलव्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य या विषयांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित सरपंचांना केले. सामाजिक भूमिका जपत लोकमत महिलांचा सर्वांगीण विकास, क्रीडा, बदलते तंत्रज्ञान, ग्रामविकास या विषयांवर करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.---------------बीकेटीचे सामाजिक दायित्वातून भरीव कार्यबीकेटी टायर्सचे सचिन लाहोटी आणि नेत्रानंद आंबडेकर यांनी बीकेटी टायर्स बद्दल माहिती दिली. बीकेटी १३० देशांमध्ये आपले उत्पादन निर्यात करते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सामाजिक दायित्त्व विविध सामाजिक उपक्रमही बीकेटीच्या माध्यमातून राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बीकेटीच्या टायर्स उत्पादनाची चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली.-----------‘महिंद्रा ट्रॅक्टर’ ग्रामीण जीवनाचा घटकमहिंद्रा ट्रॅक्टरचे अंबरीश लाहोटी यांनी कंपनीच्या माध्यमातून केवळ ट्रॅक्टर विक्री होत नसून, विविध शेतकºयांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर व्यापक स्तरावर काम करत असल्याचे सांगितले. सरपंच अवॉर्ड प्राप्त गावांमधील दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे लाहोटी यांनी जाहीर केले. तसेच पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधीही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय अधिकारी सचिन नवले यांनी महिंद्रा ट्रॅक्टर ग्रामीण जीवनशैलीचा एक भाग बनल्याचे नमूद केले. ग्राम विकासात महत्त्वाची भूमिका असणा-या सरपंचपदावरून ‘महिंद्रा सरपंच’ हे ट्रॅक्टरचे नाव असल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या विविध सामाजिक उपक्रमांची नवले यांनी माहिती दिली.------------भारावलेल्या वातावरणात सरपंचांचा सन्मानसरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याची येथील मातोश्री लॉन्सवर जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळपासून येणाºया सरपंचांचे महाराष्ट्रीयन परंपरेनुसार कुंकू लावून औक्षण करण्यात आले. तुतारीच्या निनादाने झालेले स्वागत सरपंचांचा उत्साह वाढविणारे ठरले. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रीयन फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणाºया सरपंचांना भारावून गेल्यासारखे झाले. तेवढ्याच जल्लोषात उपस्थितांनी पुरस्कारप्राप्त सरपंचांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले........................................लोकमतने सन्मानित केलेले विजेते सरपंच१* सरपंच आॅफ द ईअर अवार्ड - संतोष रामराव लोखंडे (खासगाव, ता. जाफराबाद)२* जलव्यवस्थापन - भीमराव गंगाराम जाधव (कडेगाव, ता.बदनापूर)३* वीज व्यवस्थापन - वसंत रामभाऊ थोरवे- (शिरपूर, ता. मंठा)४* शैक्षणिक सुविधा- अविनाश श्रीराम राठोड (नायगाव, ता.मंठा)५* स्वच्छता व्यवस्थापन - पार्वताबाई सदाशिव कणसे (दैठणा, ता.परतूर)६* पायाभूत सुविधा - सचिन प्रल्हादराव मोरे (गोलापांगरी, ता.जालना)७* सुरक्षा व्यवस्थापन- दीपाली प्रशांत बोनगे (आंबा, ता.परतूर)८* आरोग्य सुविधा - फूलसिंग रतनसिंग शिंदे (चोºहाळा-मासनपूर, ता. भोकरदन)९* कृषी व्यवस्थापन -दत्तात्रय भानुदास चव्हाण (नंदापूर, ता.जालना)१०* प्रशासकीय सुविधा- बाबूराव सखाराम बेरड (पिंपळगाव रेणुकाई, ता.भोकरदन)११* पर्यावरण व्यवस्थापन- अनंत मोहनराव वैद्य (वैद्यवडगाव, ता.मंठा)१२*रोजगार व्यवस्थापन - शेख अख्तर अब्दुल (आष्टी, ता.परतूर)१३* उदयोन्मुख सरपंच आॅफ द ईअर- प्रीती अनिल खंदारे (कारला, ता. मंठा)