शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांनी शेतक-यांचे शब्द व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

जालना : देशातील स्त्री आणि शेतकरी संकटात सापडलेले असून ते फारसे व्यक्तही होऊ शकत नाहीत. साहित्यिकांनी त्यांचे शब्द होण्याची गरज आहे. यासाठी अशा प्रकारची संमेलने होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॉ. अमर हबीब यांनी केले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष साहित्यिक ललित अधाने, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, स्वागताध्यक्ष शाम सिरसाट, गझलकार सुनंदा पाटील, सामाजसेवक दत्ता बारगजे, माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव, मराठवाडा युवा साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणधीर, मंडळाचे सचिव अच्युत मोरे, कोषाध्यक्ष साहिल पाटील, शाहीर आप्पासाहेब उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.अमर हबीब म्हणाले की, साहित्यकांनी सृजनांचा वाली झाले पाहिजे. प्रत्येकातले माणूसपण जागे झाल्याशिवाय ख-या साहित्याची निर्मिती होऊ शकत नाही. हा जिल्हा हा आतापर्यंत कसदार बियाणे उत्पादनांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु यापुढे हा जिल्हा साहित्याचे कसदार बियाणे असलेला जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असेही ते म्हणाले. साहित्याच्या माध्यमातून सत्याची मांडणी केली पाहिजे. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी साहित्यिकांचे फार मोठे योगदान आहे, असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम सिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथाला पालखीत नाही तर डोक्यात घेण्याची गरज असून, युवकांनी सामाजिक भावनेतून सकारात्मक कार्यात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या पदाधिका-यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. संमेलनानिमित्त दिवसभरात कविसंमेलन, परिसंवाद, पुरस्कार वितरण इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.--------------युवकच बदल घडवू शकतात - ललित अधानेसंमेलनाध्यक्ष डॉ.ललित अधाने म्हणाले, की जगातील सर्व क्रांतिकारक बदल युवकांनी घडवून आणले आहेत. देश घडवण्यात तरुणाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या देशाच्या विकासाचे मूल्यमापन केले जाते, तेव्हा त्या देशाची शिक्षणव्यवस्था कशी आहे? त्या देशातला तरुण स्वहित व देशहिताकरिता कितपत गंभीर आहे? तो काय करतो? त्या देशातील साहित्य किती गंभीरपणे लिहिले वाचले जाते, यावर केले जाते. मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिका-यांचे संमेलनाच्या आयोजनाबद्दल त्यांनी कौतुक केले.-------