शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हडपलेली जमीन परत करण्याचे सावकाराला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:07 IST

सावकाराकडून घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही कर्जापोटी लिहून दिलेली जमीन परत करण्याचे आदेश येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था न्यायालाने सावकारास दिले आहेत.

जालना : सावकाराकडून घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही कर्जापोटी लिहून दिलेली जमीन परत करण्याचे आदेश येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था न्यायालाने सावकारास दिले आहेत. हेलस (ता.मंठा) येथील जनाबाई विठ्ठल खराबे व इतरांनी जिल्हा सहकार उपनिबंधक यांच्याकडे सावकारी अधिनियमानुसार तक्रार दाखल केली होती.या प्रकरणातील अर्जदार व वडिलांची हेलस येथील गट क्रमांक ६१५-१६ मधील साडेसहा एकर जमीन सावकार विष्णू जेमला राठोड (रा. कर्नावळ.ता. मंठा) याने २५ लाखांच्या सावकारी कर्जाच्या बदल्यात खरेदीखत करून घेतली होती. अर्जदाराच्या वडील व आजोबांनी मूळ रकमेसह पाच टक्के व्याजाने साडेसदतीस लाख पन्नास हजार रुपये साक्षीदारांसोबत सावकारास परत केले होते. त्यानंतर जमिनीचे खरेदीखत परत करण्याची विनंती केली होती. मात्र, सावकाराने तसे केले नाही. दरम्यान अर्जदाराच्या आजोबांचे निधन झाले. सावकाराने जमिनीवर ताबा करण्याचा प्रयत्न केला. सावकारी त्रासाला कंटाळून अर्जदाराच्या आई लक्ष्मीबाई यांनी १६ मे २०१७ विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी सावकाराविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मंठा सहकारी निबंधक कार्यालयातही तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये सावकार राठोड यांच्या घरात कोरे बॉन्ड, धनादेश, खरेदीखताच्या झेरॉक्स, सातबारा आढळून आले. अर्जदाराने अ‍ॅड. बी.बी. शिराळे यांच्या वतीने हे प्रकरण जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केले. जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून अर्जदाराचे वडील व आजोबांनी लिहून दिलेली जमीन सावकारी अंतर्गत येत असल्याने खरेदीखत अवैध घोषित करून रद्द करण्यात येत असून, ते अर्जदार व त्यांच्या वारसदारांना परत करण्याचे आदेश दिले. तसेच सावकारी अधिनियमानुसार संबंधित सक्षम अधिकारी यांनी आदेशाच्या अंमलबजावणीअंतर्गत सदर जमिनीचा तसा फेर करावा, असे आदेश जारी केले.सावकारीच्या चौकशी अहवालाबाबत टाळाटाळतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील शेतकरी माधव गीताराम देशमुख यांनी गावातील सावकार आसाराम लिंगसे यांच्याकडून २००४ मध्ये २५ हजार रुपये पाच टक्के व्याजाने घेतले होते. या बदल्यात दीड एकर जमिनीचे गहाण खत सावकाराच्या मुलाच्या नावे करून दिले होते. देशमुख यांनी मूळ रकमेसह व्याज देऊनही सावकाराने जमिनीचा ताबा त्यांना दिला नाही. या संदर्भात देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे सावकारी अधिनियमानुसार तक्रार केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत घनसावंगीचे सहायक निबंधक ए.एफ. आराख यांनी सावकाराच्या घरावर टाकलेल्या छाप्यात गहाण खत करून घेतलेली अनेकांची कागदपत्रे आढळून आल्याचे देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणी सुनावणी घेण्यासाठी देशमुख यांना सहायक निबंधकांनी वकील लावण्याचे सांगितले. सहायक निबंधक सावकाराची चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार देशमुख यांनी केली आहे. या संदर्भात सहायक निबंधक ए.एफ.आराख यांना विचारले असता, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.