शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतिणीला रस्त्यावरच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:53 IST

रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र रूग्णवाहिका घेऊन धावणारे चालक आपण नेहमीच बघतो. पण एका रग्णवाहिका चालकाने नातेवाईकांसह घरी निघालेल्या ओल्या बाळंतिणीला गावापासून २० किमी दूर रस्त्यावरच उतरवून पोबारा केला.

ठळक मुद्देचालकाचा उद्दामपणा : ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्करांजणी : रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र रूग्णवाहिका घेऊन धावणारे चालक आपण नेहमीच बघतो. पण एका रग्णवाहिका चालकाने नातेवाईकांसह घरी निघालेल्या ओल्या बाळंतिणीला गावापासून २० किमी दूर रस्त्यावरच उतरवून पोबारा केला. चालकाच्या उद्दामपणामुळे ओल्या बाळंतिणीला असह्य वेदना सोेसाव्या लागल्या. घनसावंगी तालुक्यातील रांजणी गावात आज ही संतापजनक घटना घडली. गावातील नागरिकांनी चौकशी केली असता हा प्रकार कळला. त्यानंतर पंचायत समिती सदस्यासह ग्रामस्थांनी वर्गणी करून खाजगी वाहनाद्वारे बाळंतिणीला घरी सोडले.घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील अनिता संतोष पाईकराव यांची जालना शहरातील महिला व बाल रूग्णालयात मंगळवारी सकाळी प्रसुती झाली. त्यांना बुधवारी दुपारी चार वाजता सुटी देण्यात आली. त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, रूग्णवाहिकेच्या चालकाने मुजोरपणा करत बाळंतीण आणि नातेवाईकांशी वाद घातला. त्यानंतर या ओल्या बाळंतिणीला जिरडगावपासून २० कि़ मी. दूर अंतरावर असलेल्या रांजणी गावाजवळ रस्त्यावरच उतरवले. अनिता यांच्यासोबत दोन लहान मुली, सासू, सासरे आणि पती आणि एक तासाचे बाळ घेऊन हे कुटुंब रस्त्यावरच बसले होते. रस्त्यावर बसलेल्या पाईकराव कुटुंबियांची गावातील काही जणांनी चौकशी केली असता हा संतापजनक प्रकार समोर आला. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य शेख रहीम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील नागरिक मदतीला धावून आले. ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करत त्यांना खाजगी वाहन करून दिले. मदत मिळल्याानंतर अनिता यांचे सासरे तात्यासाहेब यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.