देऊळगाव राजा शहरातील सिव्हिल कॉलनी येथे सुरू करण्यात आलेल्या राजमुद्रा करिअर पॉईंट शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजमुद्रा या संस्थेची स्थापना १ मे २०१३ रोजी औरंगाबाद येथे करण्यात आली. संस्थेच्या शाखा पुणे, बुलडाणा व औरंगाबाद येथे असून आजपर्यंत संस्थेने शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी काम केले. परंतु, खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असून, त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व जास्तीत जास्त अधिकारी हे शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील व्हावेत, या उद्देशाने राजमुद्रा करिअर पॉईंट या संस्थेची शाखा देऊळगाव राजा शहरात सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक भिंगारे, सानप, काकडे, शिंदे, लंके, टेकाळे, काकडे, दूनगहू यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विजय घोंगे, सवडे, प्रमोद घोंगे, अशोक कांबळे, कुटे, रवी लाटे, बोरकर, अजय शिवरकर, दीपक बुरकुल, गणेश बुरकुल, डिगांबर भानुसे, रामेश्वर भानुसे, बाळाभाऊ भानुसे, राजेंद्र भानुसे, गणेश भानुसे आदींची उपस्थिती होती.
(जाहिरात विभाग)