शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतिफांना बसणार चाप; वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्यूआर कोडप्रणालीद्वारे हजेरी

By विजय मुंडे  | Updated: September 30, 2022 19:23 IST

राज्यातील पहिला प्रयोग, वेतनाचा प्रश्नही लागणार मार्गी

- विजय मुंडेजालना : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी आता क्यूआर कोडप्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. सीईओ मनूज जिंदल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत राज्यात प्रथमच हा प्रयोग राबविण्यात आला असून, यामुळे लेटतलिफांना चाप बसणार आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विलंबाने होणारे वेतन वेळेवर होण्यास मदत होणार आहे.

क्यूआर कोडप्रणालीद्वारे दैनंदिन हजेरी उपक्रमास शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी सीईओ जिंदल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. म्हस्के, डॉ. जयश्री भुसारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उशिराने येत असल्याच्या अनेक तक्रारी सीईओ जिंदल यांच्याकडे आल्या होत्या. शिवाय यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या दैनंदिन हजेरी उपक्रमात तांत्रिक दोष असल्याची ओरडही होती. ही बाब पाहता क्यूआर कोडप्रणालीद्वारे दैनंदिन हजेरी घेण्याची संकल्पना सीईओ जिंदल यांनी मांडली. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध संस्थांशी चर्चा करीत ही प्रणाली शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी कार्यान्वित केली.

या प्रणालीद्वारे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१८ उपकेंद्रे, ८ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, युनानी, आयुर्वेदिकच्या ८ संस्था अशा जवळपास २७० हून अधिक संस्था जोडल्या जाणार आहेत.

जिंदल यांचे दोन उपक्रम राज्यभरातयापूर्वी सीईओ मनूज जिंदल यांनी कोरोनाकाळात जिल्ह्यात राबविलेला ‘मिशन कवच कुंडल’ हा लसीकरणाचा उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. शिक्षकांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी राबविण्यात येणारा ‘पीएफएमएस’प्रणाली हा उपक्रमही अनेक जिल्हा परिषदांमध्ये लागू झाला आहे. आता क्यूआर कोडद्वारे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी उपक्रमही राज्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.

शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी वेळेत कार्यालयात यावेत, त्यांच्या हजेरीचा प्रश्न मार्गी लागावा, त्यांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी क्यूआर कोडप्रणालीद्वारे दैनंदिन हजेरीचा उपक्रम प्रथमत: आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात आला आहे. याचा नक्कीच प्रशासकीय कामकाजात लाभ होईल.- मनूज जिंदल, सीईओ, जि.प., जालना

टॅग्स :Jalanaजालनाdoctorडॉक्टर