लिंगेवाडी ग्रामपंच्यात निवडणुकीत भाजपाचे कमलाकर साबळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली. त्यामध्ये ॲड. रवींद्र साबळे, पुष्पाताई रवींद्र साबळे, दुर्गाबाई बालाजी लोखंडे, संतोष विरे, आप्पा शिंदे, पार्वतीबाई विष्णू मतकर, सदाशिव साबळे, लीलाबाई मगरे हे प्रचंड मताने विजयी झाले होते. त्यानंतर सरपंचपदी पुष्पाताई साबळे व उपसरपंचपदी सदाशिव साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करून जल्लोष केला. यावेळी लीलाबाई मगरे, संजय शिंदे, बबन साबळे. विष्णू मतकर, हनुमंता शिंदे, शंकर शिंदे, संतोष दळवी, सुनील शिंदे, कचरू विरे, अनिल जाधव, केशव देवरे, बालाजी जारे, रामेश्वर साबळे, हरिदास लोखंडे, निवृत्ती साबळे, सुरेश घोडे, श्यामराव मगरे, दत्तू विरे, समाधान रेठे, गजानन शिंदे, गणेश देवरे, विनायक मगरे, विनोद देवरे, नारायण साबळे यांच्यासह लिंगेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो