शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता अ‍ॅप’ कडे स्मार्ट जालनेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:45 IST

आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनवर ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास जालनेकरांकडे वेळच नसल्याचे चित्र आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : शहरातील स्वच्छतेबाबत कायम ओरड होत असली तरी आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनवर ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास जालनेकरांकडे वेळच नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक मिनिटाला फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस चेक करणारी युवा पिढीही स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे यानिमित्ताने उघड होत आहे.स्मार्टफोनच्या जमान्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आॅनलाइन व्यस्त आहे. त्यामुळे नागरिकांना थेट मोबाईलवरच अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील अस्वच्छतेबाबत तक्रार करता यावी. तसेच सर्व रेकॉर्ड आॅनलाइन उपलब्ध व्हावे, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने स्वच्छता अ‍ॅप सुरू केले. महापालिका, नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे याकरिता व्यापक जनजागृती केली जात आहे. जालना नगर पालिकेने नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तीन लाख लोकसंख्येपैकी आठवडाभरात केवळ दीड हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे हे प्रमाण ०.५ टक्के आहे. प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत नसला तरी शहर स्वच्छतेवर कायम ओरड होणाºया जालनावासियांनी अ‍ॅपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने तक्रार करण्यास उदासीनता भूमिका घेतली आहे. जालना शहरातील सहा हजार नागरिक पहिल्या आठवड्यात अ‍ॅप डाऊनलोड करतील, अशी अपेक्षा पालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकाºयांना होती. परंतु नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करा, असे सांगत फिरण्याची वेळ आता पालिका कर्मचाºयांवर आली आहे. जालना एक्स्पोच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याबाबत खंत व्यक्त केली. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी वेळेत सोडविल्या जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.-----------स्वच्छता अ‍ॅपचे महत्त्व काय ?स्वच्छतेबाबतीत जालन्याचा देशातील क्रमांक ३३७ वा आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केल्यास स्वच्छतेच्या मानांकनात वाढ होणार आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आॅनलाइन तक्रारी दाखल केल्यास त्या पालिकेच्या पथकाला चोवीस तासांत तक्रार निवारण करून त्याचे फोटो अ‍ॅपवर अपलोड करावे लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या चार हजारांपैकी अधिकाधिक गुण मिळणार आहेत. भविष्यातील विकास कामांचा निधी मिळण्यास यास फायदा होणार आहे.