शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

व्हिजिओ पॉलिटेकमध्ये जालन्याचे नाव राज्य स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:58 IST

औरंगाबाद येथील महात्मा गांधी महाविद्यालयात व्हिजिओ पॉलिटेक-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जालना येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्री हिटींग सिस्टीम या प्रोजेक्टने राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जालना : औरंगाबाद येथील महात्मा गांधी महाविद्यालयात व्हिजिओ पॉलिटेक-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जालना येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्री हिटींग सिस्टीम या प्रोजेक्टने राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दुचाकीचे अ‍ॅव्हरेज वाढविण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त आहे.व्हिजिओ पॉलिटेक २०१८ मध्ये राज्यभरातून अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवून आपले प्रोजेक्ट सादर केले. यामध्ये जालना येथील मत्स्योदरी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी गौरव राजू घोडके, अक्षय दामोदर पोघाडे, गणेश कडूबा निकाळजे, अमन भरत गिरी यांनी टू व्हीलरचे अव्हरेज वाढविण्याचा प्रोजेक्ट सादर केला. प्रयोगासाठी काही तांत्रिक बदल केलेल्या मोपेडच्या सायलेन्सरला पत्रा व नळीद्वारे थेट इंजनला गरम हवा पुरवठा करून पेट्रोलची बचत व संपूर्ण पेट्रोल जळण्याचा हा प्रोजेक्ट होता. या प्रोजेक्टला राज्यातून द्वितीय पुरस्कार देण्यात आला आहे.याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले, की आम्ही मेकॅनिकल तृतीय वृर्षाचे शिक्षण घेत आहोत. या प्रयोगात आम्ही प्री-हिटींग इंजिन सिस्टीम मोपेड सारख्या कमी वजनाच्या व टू स्ट्रोक दुचाकीच्या सायलेन्सरला एका जाळीवर पत्रा व नळीद्वारे थेट इंजिनच्या कॉर्बोरेटरला गरम हवा पुरवठा केला. यामुळे वाहन धावतानाही इंजिनला त्याचा फायदा होतो. पेट्रोलचीही १० टक्के बचत होते. आम्ही लवकरच हा प्रोजेक्ट फोरस्ट्रोक इंजिनमध्ये विकसित करणार आहोत. या प्रोजेक्टला प्री हिटींग सिस्टीम असे नाव देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.