शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

घाणेगाव ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:56 IST

वारंवार तक्रार करूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी जांबसमर्थ तलावात जाऊन जलसमाधी आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : वारंवार तक्रार करूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी जांबसमर्थ तलावात जाऊन जलसमाधी आंदोलन केले. महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आंदोलकांची समजूत घालत संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले. चार तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना काही वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आलेला आहे. या गावातील नागरिकांना जांब समर्थ येथील सोसायटीमार्फत संलग्न दुकानातून स्वस्त धान्य वाटप केले जाते. सोसायटीचे धान्य वाटप मात्र परवाना निलंबित असलेल्या जुन्याच विक्रेत्याकडून केले जात आहे. त्यामुळे गावातील अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळत नाही. याबाबत संबंधित ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त महिला व पुरुष सकाळी गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जांबसमर्थ तलाजवळ पोहोचले. सर्वांनी तलावाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास पाण्यातच जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार अश्विनी डमरे, घनसावंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुळसीदास धुमाळ, नायब तहसीलदार गणेश पोलास, पेशकर मोरे, मंडळाधिकारी एस.बेले, तलाठी थालके, लिपिक सुशील जाधव आदी दुपारी एक वाजता जांबसमर्थ तलाव परिसरात पोहोचले. अंबड अग्निशमन दलाच्या पथकाला आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आली. तहसीलदार डमरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित स्वस्त धान्य विक्रेत्यावर कारवाई करण्यासह आंदोलन कर्त्यांच्या अडचणी सोडविण्याचे लेखी लिहून दिले. त्यानंतर चार तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.