शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

By दिपक ढोले  | Updated: August 17, 2023 20:41 IST

Jalana News: मारहाण करणाऱ्या  आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जालना - मारहाण करणाऱ्या  आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रवि हिरालाल चौधरी (रा. म्हाडा कॉलनी, जालना) असे आरोपीचे नाव आहे. १५ मे २०२२ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी विनित कुलथे व सार्थक गाजरे हे दोघे घराजवळ बसले होते. त्याचवेळी आरोपी रवि चौधरी याने फिर्यादीचा मित्र सार्थक गाजरे याच्या पोटात चाकूने भोसकून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी आरोपीविरुध्द विनित कुलथे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये जखमी साक्षीदार, डॉक्टर व इतर साक्षीदार तसेच तपासिक अंमलदार भगवान नरोडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व आलेल्या साक्षीपुराव्या वरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी आरोपी रवि हिरालाल चौधरी याला एक वर्षाची सक्त मजुरी आणि सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जखमीला नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. भारत खांडेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयJalanaजालना