शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शौचालयांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:59 IST

घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार असून, यासाठी जिल्हास्तरावरुन समितीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.घनसावंगी तालुक्यात पायाभूत सर्वेक्षण २०१२ नुसार वैयक्तीक शौचालयाची कामे करण्यात आली. परंतु, बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये कामे निकृष्ट झाल्याच्या ९ ते १० तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाकडे प्राप्त झालेल्या आहे. काही ठिकाणी शौचालयाचे काम न करताच रक्कम काढण्यात आलेली आहे. तर ग्रामपंचायतीने पायाभूत सर्वेक्षणा बाहेरील अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिल्याच्या तक्रारीही प्राप्त झालेल्या आहे. या तक्रारीची दखल घेऊन याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हास्तवरुन समितीची नियुक्ती केली असून, पाच जणांची ही समिती महिन्याभरात हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे सादर करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही बोगस शौचालयाचा मुद्दा गाजला होता. सदस्य जयमंगल जाधव यांनी घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक गावांत शौचालयांचे काम निकृष्ट झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. तालुक्यातील बोरगावची रीतसर तक्रार ही आली होती.घनसावंगी तालुक्यात शौचालयांची कामे निकृष्ट दर्जेचे झाले असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहे. या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही जिल्हास्तरावरुन समिती नेमली आहे. ही समिती महिन्याभरात अहवाल देणार आहे.- निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalna z pजालना जिल्हा परिषदfraudधोकेबाजी