शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:30 IST

गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.हा संप मागे घ्यावा म्हणून मध्यस्थी करण्यात येत आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन संप मागे घेण्याची मागणी केली. असे असताना बँकेच्या अध्यक्षांनी भेट का दिली नाही, असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे.ऐन दुष्काळात अनुदान व पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांना संपामुळे त्रास सहन करावा लागत आहे. न्याय व हक्काच्या मागण्यासाठी बँक व व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने को-आॅपरेटीव्ह बँक एम्लाईज युनियनच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांचे १८१ कर्मचारी ११ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत.सन २०१० पासून स्थगित असलेला महागाई भत्ता प्रचलित दराने शंभर टक्के अदा करावा या व इतर मागण्या १५ दिवसात मान्य न केल्यास बेमुदत संपाबाबत कळविण्यात आले होते. तरी देखील बँक व्यवस्थापनाने कोणताही निर्णय न घेतल्याने संप करण्यात येत आहे. २००७ मध्ये न्यायालयाने महागाई भत्ता देण्याबाबत निकालही दिला होता. मात्र, या निकालाकडे बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अडीच ते तीन कोटी रुपये जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा भत्ता थकीत आहे. तसेच बीड, औरंगाबाद, परभणी येथील शाखेतील कर्मचा-यांना हा भत्ता मिळत असून, केवळ जालना जिल्ह्यातील कर्मचा-यांवरच अन्याय होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात जास्त शेतक-यांचे या बँकेत खाते आहे. त्यामुळे याच बँकेत शेतक-यांना मिळणारे अनुदान वर्ग केले जाते, मात्र, बँकेच्या संपामुळे शेतक-यांच्या अनुदानाच्या याद्या व धनादेश तहसील कार्यालयात पडून आहेत. दरम्यान या संदर्भात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, कर्मचा-यांच्या मागणीवर यशस्वी तोडगा संचालकांच्या बैठकीत निघेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Strikeसंपbankबँक