शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या चेंबरवर ढापे टाकण्याचे नगरविकास विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST

जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, भरतनगर, दधीच चौक, टाऊन हॉल, कालीकुर्तीसह शहरातील प्रमुख रस्ते, विविध वसाहतींमध्ये नगरपरिषदेच्या ...

जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, भरतनगर, दधीच चौक, टाऊन हॉल, कालीकुर्तीसह शहरातील प्रमुख रस्ते, विविध वसाहतींमध्ये नगरपरिषदेच्या वतीने भुयारी गटारांची कामे करण्यात आली आहेत. दोन भुयारी गटार पाईपला जोडण्यासाठी असलेल्या चेंबरवर काही ठिकाणी ढापे टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरून साथ रोग पसरण्याची शक्यता आहे. चेंबरवर ढापे टाकण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत नगरपरिषद अभियंत्यांना ढापे टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही ठिकाणी ढापे टाकण्यात आले. मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने हे ढापे काही दिवसांतच तुटून पुन्हा चेंबर उघडे पडले होते. याबाबत ॲड. धन्नावत यांनी छायाचित्रांसह मुख्यमंत्री कार्यालयात ऑनलाईन निवेदनाद्वारे तक्रार केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने समस्येचे गांभीर्य ओळखून नगरविकास विभाग -२ कडे ॲड. धन्नावत यांचा अर्ज हस्तांतरित केला. नगरविकासचे कक्ष अधिकारी उदय सार्दळ यांनी मंगळवारी समस्या निवारणाबाबत निर्देश दिल्याची माहिती ॲड. धन्नावत यांनी दिली.