शहरातील आंबेडकर नगर, कुरेशी मोहल्ला, देऊळ, बागवान गल्ली या भागांतील २०० केव्हीचे रोहित्र चार दिवसांपूर्वी जळाले होते. रोहित्र जळाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. सध्या कडाक्याचे ऊन पडत असल्याने नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत होती. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा महावितरणकडे तक्रारी केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही बाब नागरिकांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कानावर घातली. यानंतर टोपे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रोहित्र बसविले असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल डॉ. संजय काळे, राहुल खरात, अब्बास कुरेशी, मुनाफ कुरेशी, खाजा बागवान, फिरोज कुरेशी, अनिस कुरेशी, बुढन कुरेशी, अंकुश घोडे, चांद कुरेशी, अतिक शहा, दीपक खरात आदींची उपस्थिती होती.
रोहित्र बसविल्याने विद्युत पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST