शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँक्रिटीकरणाची होणार तज्ज्ञांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:45 IST

राजेश भिसे/जालना : शहरात झालेल्या प्रमुख मार्गांच्या काँक्रिटीकरणाची कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती यंत्राद्वारे तपासणी करणार असल्याची माहिती ...

राजेश भिसे/जालना : शहरात झालेल्या प्रमुख मार्गांच्या काँक्रिटीकरणाची कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती यंत्राद्वारे तपासणी करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी रविवारी दिली. ‘काँक्रिटीकरणाची वर्षपूर्ती’ ही वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. आगामी पंधरा दिवसांत तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी समितीला दिले आहेत.जालनेकरांची खड्डेमुक्त रस्त्यांपासून कायमची सुटका करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. विविध प्रमुख मार्गांची काँक्रिटीकरणाची कामे सुरू करण्यात आली. पाच एजन्सीजना हे काम देण्यात आले. मात्र, रस्त्यांचे काँक्रिटीकरण निकषांनुसार झाले नाही. निकृष्ट कामे झाल्याची खदखद नागरिकांच्या मनात होती. जालनेकरांच्या मनातील ही खदखद लोकमतने ‘काँक्रिटीकरणाची वर्षपूर्ती’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून ऐरणीवर आणली. रस्ते काम करताना निकष कशा पद्धतीने डावलण्यात आले, कुठल्या भागातील कामे निकृष्ट झाली याची पोलखोल वृत्तमालिकेतून करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत औरंगाबादच्या सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुंदरदास भगत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी दिले. तशा आशयाचे पत्रच चव्हाण यांनी काढले आहेत. चौकशी समितीत सहायक अभियंता राजेंद्र बोरकर (पैठण, श्रेणी-२) उपअभियंता बी.पी. चव्हाण (गंगापूर-श्रेणी-१) सहायक अभियंता ए. आर. भालचंद्र (श्रेणी-२), के.एम.आय. सय्यद (श्रेणी-२) यांचा समावेश आहे.रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गुणवत्ता तपासणीसाठी सुंदरदास भगत यांची चौकशी समिती दोन दिवसांत जालन्यात दाखल होणार आहे. कामांची तपासणी व चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी स्थानिक अभियंत्यांना डावलून मुद्दामहून औरंगाबाद विभागातील अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशी समितीमधील अभियंता शहरातील विविध भागांत झालेल्या काँक्रिटीकरण व इतर कामांचे कोर क्युब नमुने, प्रत्यक्ष चाचणी निष्कर्ष, कामाची सद्य स्थिती, अभिलेखे व गुणवत्ता यासह कामाची सर्व बाबींची समिती पाहणी करणार आहेत. काँक्रिटीकरण करताना निविदेनुसार सर्व निकषांचे पालन झाले का, सिमेंट, खडी, लोखंडांचा वापर, रस्त्याची प्रत्यक्षात असलेली जाडी याचा सर्वांगीण तपासणी समिती करणार आहे. तसेच शोल्डर पेव्हर बसविताना निकषांचे पालन झाले का, निविदेमध्ये दाखल कालावधीतच रस्त्याचे काम पूर्ण झाले का, या सर्व बाबींची या विभागीय समितीमार्फत अत्यंत बारकाईने तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद येथील विभागीय अभियंत्यांना सादर करणार आहे. त्यानंतर अहवालाचा अभ्यास करुन कार्यवाहीची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.------------शहरातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या नागरिकांतून तक्रारी आल्या होत्या. तसेच लोकमतमध्ये याबाबतची वृत्तमालिका प्रकाशित झाल्याने काँक्रिटीकरणाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी विभागीय समितीची स्थापना केली आहे. पंधरा दिवसांत समिती आपला अहवाल सादर करेल. अहवालाचा अभ्यास करून कार्यवाहीची पुढील दिशा स्पष्ट होईल.- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, औरंगाबाद विभाग......................जालनेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणत आहोत. याचा विनियोग योग्य मार्गाने व्हावा, ही आपली भूमिका आहे. लोकमतने सिमेंट रस्त्याच्या कामांबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर अधीक्षक अभियंता चव्हाण यांच्याकडे या कामांची चौकशीची मागणी आपण केली होती. यावर समिती स्थापन केली असून, सत्य काय ते लवकरच बाहेर येईल.- खा. रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.