शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून २६ गावांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:04 IST

देशभरातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत गुणांकन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने १४ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत असून, हे पथक जिल्ह्यातील २६ गावांची पाहाणी करत आहे.

ठळक मुद्देआॅन द स्पॉट तपासणी । तीन जणांचे पथक जालना जिल्ह्यात

जालना : देशभरातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत गुणांकन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने १४ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत असून, हे पथक जिल्ह्यातील २६ गावांची पाहाणी करत आहे. या २६ गावातील स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये झालेल्या जाणीवजागृतीचीही माहिती घेत आहे.शहराच्या ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या धर्तीवर ग्रामीण भागात हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेत त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. अभियानात गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची निरीक्षणे; तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार घेण्यात येणार आहेत. देशभरात हे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीची निवड ‘नमुना निवड पध्दतीने’ सर्वेक्षण करणाºया संस्थेकडून करण्यात आली आहे.ही संस्था ग्रामस्थांना आॅनलाइन व प्रत्यक्ष सहभागी करुन घेऊन गावपातळीवर जाऊन सरपंच, ग्रामसवेक, स्वच्छतागृह, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, व शिक्षकांच्या मुलाखती घेत आहे.याच्या विविध कामांसाठी गुण असून, एकूण शंभर गुणांसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी ऐनवेळी २६ गावांची निवड करण्यात आली आली आहे. यातील अबंड, भोकरदन व जालना तालुक्यातील काही गावांची पाहणी केंद्राच्या पथकाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक जिल्ह्यात दखल झाले असून, हे पथक २६ गावांची पाहणी करीत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली. एकूणच या पाहणीतून शौचालय अनुदान वाटपातील निधीचीही झाडाझडती घेतली जाणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान