शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय क्षेत्राकडे मुलींचा वाढता कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:01 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढला असून, मोठ्या प्रमाणात मुली आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी जालना येथील आयटीआय संस्थेत जवळपास ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी प्रवेश घेतला असून यात इलेक्ट्रिकलमध्ये २५ टक्के मुलींनी प्रवेश घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढला असून, मोठ्या प्रमाणात मुली आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी जालना येथील आयटीआय संस्थेत जवळपास ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी प्रवेश घेतला असून यात इलेक्ट्रिकलमध्ये २५ टक्के मुलींनी प्रवेश घेतला होता.सध्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रमाणही जास्त दिसत आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात त्यांची जाण्याची तयारी असते. औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रातही मुलींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच जिल्ह््यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात मुली प्रवेश घेत आहे. मागील वर्षी ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी येथील आयटीआय संस्थेत प्रवेश घेतला होता. यात इलेक्ट्रिकल कडे मुलींचा ओघ असून, जवळपास २५ टक्के मुलींनी यात प्रवेश घेतला आहे. तर वायरमन, मोटर मॅकेनिकल याला २० टक्के मुली प्राधान्य देत आहे. तर फिटर आणि डिझेल मॅकेनिकल यासह इतर कोर्ससकडेही मुली जाताना दिसत असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य देविदास राठोड यांनी दिली. आयटीआय सारख्या क्षेत्रात ८५ ते ९० टक्के पेक्षा जास्त गुण असलेले मुले प्रवेश घेत आहे. याचे मुख्य कारण म्हणेज, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने याकडे सर्वांचाच कल दिसत आहे. त्यामुळे मुलांबरोबर मुलीही या क्षेत्राला प्राधान्य देताना दिसत आहे. दरम्यान, येथील आयटीआय संस्थेत राज्यभरातून विद्यार्थी येत प्रवेश घेत आहे. मागील वर्षी मुलींनी इलेक्ट्रिकलला प्राधान्य दिले होते. यावर्षी मुली इतरही कोर्सेसला प्राधान्य देण्याची आशा आहे. यावर्षीही मुलींचे प्रमाण या क्षेत्राकडे जास्त असू शकते, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducation Sectorशिक्षण क्षेत्र