शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

समन्वयाअभावी पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:40 IST

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे

जालना : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचा-यांमधील समन्वयाच्या अभावामुळे संयुक्त पंचनाम्याचे काम गुरुवारी चौथ्या दिवशीही पूर्ण झाले नाही.जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे २०८ गावांमधील सुमारे ३८ हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा, तूर या हंगामी पिकांसह द्राक्ष डाळिंब आणि मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता जालना, मंठा आणि जाफराबाद तालुक्यात अधिक आहे. जालना तालुक्यातील ६२ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. अद्याप केवळ दहा गावांमधील पंचनामे पूर्ण झाले आहे. बाधित सर्व गावांमधील पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल प्राप्त झाला नसल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त ४५ गावांपैकी तलाठी उपलब्ध असलेल्या २३ गावांमधील पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली. अशीच स्थिती जाफराबाद तालुक्यातही आहे. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा, देळेगव्हाण, पोखरी, सातेफळ, बुटखेडा इ. गावांमध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले. फळबागा व शेडनेटच्या नुकसानीचे पंचनामे अगोदर करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे तहसीलदार जे.डी.वळवी यांनी सांगितले. अन्य पिकांच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यात अधिका-यांमधील असमन्वयामुळे पंचनाम्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. तहसीलदार रजेवर असून, तालुका कृषी अधिकारी एस. आर.पोटे सोमवारपासून कार्यालयातच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी शेतात येऊन पंचनामे करतील याची दोन दिवसांपासून वाट पाहत आहोत, मात्र अद्याप एकही अधिकारी व कर्मचारी शेतात फिरकला नसल्याचे मच्छिंद्र चिंचोली येथील शेतकरी नंदकिशोर घोगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांचे पंचनामे अद्याप अपूर्णच आहेत.--------पंचनामे तातडीने पूर्ण करावेतकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभाती माणिकराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.----------गारपीट ग्रस्त भागांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या कामात हयगय करणा-या कर्मचा-यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल.-शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना.--------------