शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

By विजय मुंडे  | Updated: November 8, 2024 15:33 IST

या मतदार संघात ११ उमेदवारांमध्ये मध्ये चार अपक्ष

- विजय मुंडेजालना :परतूर विधानसभा मतदार संघातील महायुती, मविआच्या गडाला बंडखोरीचे ग्रहण लागले असून, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपमधील प्रमुख पदाधिकारी असले तरी आपली वेगळी चूल मांडून राजकारण करणारे आ. बबनराव लोणीकर आणि मविआतील मित्रपक्ष उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.

भाजपचा जिल्ह्याच्या राजकारणात वरचष्मा आहे. परंतु, रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर हे दोन गट असून, दोन्ही नेत्यांकडून आपापल्या भागात काम केले जाते. जिल्ह्यातील विविध संस्थांच्या निवडणुकांत मात्र हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोड्या करीत असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून दिसून आले आहे. भाजपच जिल्ह्यातील तीन जागा लढवत असून, त्यात परतूर येथे माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परतूर विधानसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार आहेत. त्यात महायुतीतील मित्रपक्ष भाजपकडून आ. बबनराव लोणीकर, मविआतील मित्रपक्ष उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. 

परंतु, महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल आणि मविआतील मित्रपक्ष काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी बंडखाेरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. जेथलिया यांनी यापूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. लोणीकर यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे ते तगडे उमेदवार मानले जातात. शिवसेना शिंदे गटाची मतदार संघात फळी मजबूत करण्यात अग्रवाल यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे ते ए.जे. बोराडे यांची डोकेदुखी वाढवू शकतात. ही बंडखोरी भेदून आपल्या पक्षाचा झेंडा मतदार संघावर फडकाविण्याचे कडवे आव्हान दोन्ही उमेदवारांसमोर आहे.

११ मध्ये चार अपक्षया मतदार संघात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह बसपाचे अहेमद महंमद शेख, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) चे आसाराम राठोड, ऑल इंडिया हिंदुस्थान काँग्रेस पार्टीचे कृष्णा पवार, जय सेवालाल बहुजन विकास पार्टीचे श्रीराम जाधव, वंचित बहुजन पार्टीचे रामप्रसाद थोरात यांच्यासह चार अपक्ष उमेदवारही निवडणूक आखाड्यात आहेत. यामुळे दोन्ही बंडखोरांसह इतर पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार किती मते घेतात यावरच विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024partur-acपरतूरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकBJPभाजपाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर