शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सर्वेक्षण; शहराचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:44 IST

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्चअखेर देशातील चार हजार शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाबरोबच हगणदारीमुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छतेत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षणांतर्गत नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी स्वच्छता अ‍ॅपही उपलब्ध करून देण्यात आले होते. अ‍ॅपवर प्र्राप्त तक्रारी व उपाययोजनांमुळे जालना शहर सध्या ८८ क्रमांकार आहे. पालिकेने शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार शहरात प्रत्यक्ष काम झाले आहे, का याची तपासणी करण्यासाठी शहरात सुरू असलेल्या तपासणीचा सोमवारी सायंकाळी समोराप झाला. केंद्रीय पथकातील प्रकाश मुतळे यांनी चार दिवस शहरात फिरून कचरा डेपो निष्कासित करणे, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांचा वापर, घंटा गाड्यांद्वारे होणारे कच-याचे संकलन, व्यापारी भागात होणारी रात्रीची स्वच्छता, हगणदारीमुक्त ठिकाणे याची तपासणी केली. पालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे, माधव जामधडे यांनी मुतळे यांना सहकार्य केले.स्वच्छता सर्वेक्षणाच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. मार्चअखेर देशातील चार हजार शहरांचे मूल्यांकन झाल्यानंतर उत्कृष्ट कार्य करणा-या तीन शहरांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यातील पहिले पारितोषिक १५ कोटींचे असणार आहे.जालना नगरपालिका : तपासणीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापरशहर स्वच्छतेचे मूल्यांकन करताना अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष स्वच्छतेची छायाचित्रे प्रथमच मोबाईल अ‍ॅपमध्ये घेऊन तात्काळ पाठविण्यात आली. शहरातील नूतन वसाहत, कन्हैय्यानगर, लालबाग, इंदिरानगर, घायाळनगर इ.भागांतील नागरिकांचे प्रत्यक्ष अभिप्रायही नोंदविण्यात आले. अनेक नागरिकांनी पूर्वीपेक्षा शहर स्वच्छतेत सुधारणा झाल्याच्या प्र्रतिक्रिया तपासणीदरम्यान व्यक्त केल्या.