संभ्रम वाढत होता...
परीक्षांच्या तारखा वांरवार लांबत असल्याने केलेला अभ्यास स्मरणात ठेवणे अवघड झाले होते. तसेच परीक्षेस उशीर होत असल्याने मनाची द्विधा अवस्था होत होती. अखेर ही परीक्षा आज पार पडली. त्यामुळे मनावरचे दडपण हलके झाले आहे.
-शिवानी शिरसाट, कुंभेफळ
----------------------------------------------
लहानपणापासूनच अधिकारी होऊन प्रशासनात जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे औरंगाबादेत राहून या परीक्षेची तयारी केली होती; परंतु तयारी करून तो अभ्यास कायम स्मरणात ठेवणे अवघड असते. त्यामुळे ही परीक्षा वेळेवर झाली असती तर आणखी चांगला रिझल्ट येऊ शकला असता.
-निकिता कुबेर, जालना
----------------------------------------
यंदाच्या एमपीएससी परीक्षेत मुलांप्रमाणेच मुलींची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. ही बाब चांगली असून, मुलींनी देखील कुठेच मागे न राहता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगले करिअर करता येते. त्यामुळे आपण माझे पती योगेश दानवे यांच्या प्रेरणेतून ही परीक्षा दिली आहे. रिझल्ट नक्कीच चांगला येईल, अशी आशा आहे.
-संगीता दानवे, जवखेडा
-----------------------------------------------
आपण प्रशासनात अधिकारी व्हावे ही इच्छा आई-वडिलांची होती. त्यामुळे त्यातून आम्ही या परीक्षेची तयारी केली होती; परंतु परीक्षा तब्बल दोन वर्षे लांबल्याने यातील क्रेझ संपली होती. आता ही परीक्षा होणे नाही, असेच वाटले होते; परंतु सरकारने एकदाची ही परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
-गोमटेश मुरमकर, जालना
--------------------------------------
खासगीत पातळीवर आज रोजगाराच्या संधी आहेत; परंतु त्यांची हमी नसते. ही परीक्षा दिल्यावर सरकारी सेवेत रुजू होऊन प्रशासनात सहभाग घेऊन काही चांगले काम करण्याची संधी मिळते. यामुळे आपण ही परीक्षा देत आहोत.
-अविनाश शिंदे, अंबड
---------------------------------------------------
राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रशासकीय सेवेत वर्ग दोनची पदे भरली जातात. ही पदे आज मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे ही परीक्षा देण्याचे ठरविले आहे. पहिला पेपर चांगला गेला असून, दुसऱ्याची तयारी केली होती. आता निकलाकडे लक्ष लागून आहे.
-निखिल घाडगे, घनसावंगी
------------------------------------------------
अखेर मुहूर्त सापडला
राज्य लोकसेवा आयोगाने ही पूर्वपरीक्षा सलग सहा वेळेस पुढे ढकलली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्याचा चांगल परिणाम होऊन आज ही परीक्षा पार पडल्याने समाधान आहे.
-नितीन देशमुख, घनसावंगी
----------------------------------------------
आम्ही इंजिनिअरिंग केले आहे. तरीदेखील एक प्रशासनातील रुबाब आणि बजावता येणारे कर्तव्य यामुळे आपण ही परीक्षा देत आहोत. परीक्षेची तयारी केली आहे. आता निकाल चांगला येईल, असा विश्वास आहे.
-रवी मरकड, सिंदखेडा
------------------------------------------
एमपीएससीसाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहोत. बीए पदवी पूर्ण केल्यावर शासकीय सेवेची आवड होती. त्यामुळे घरच्यांच्या आग्रहाखातर ही परीक्षा दिली आहे. ही परीक्षा लांबणीवर पडल्याने आमचा गोंधळ उडाला आहे.
-कृष्णा कोरडे, अंबड
--------------------------------------------------
वडील प्रशासकीय सेवेत असल्याने आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावे, अशी अपेक्षा पूर्वीपासून होती. त्या दृष्टीने वडिलांकडूनही प्रेरणा मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण या परीक्षेची तयारी औरंगाबादेत राहून पूर्ण केली. या परीक्षेचा निकाल सकारात्मक येईल, असा विश्वास आहे. ही परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने देखील अभ्यासातील सातत्य कमी झाले होते.
-रोहन गिरी, जालना
-------------------------------------------