शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी सर्वात मोठा धर्म- भास्कर महाराज देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:08 IST

समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : गुरुपौर्णिमा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, ते व्हायलाच हवेत. सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. माणुसकी हाच जगातला सर्वात मोठा धर्म आहे. समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.जाफराबाद येथील श्री राधाकृष्ण नवनाथ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. भास्कर महाराज म्हणाले, अनाथ, गरजू आणि असहाय असलेल्या लोकांची सेवा करणे म्हणजे खरी मानवता आहे. मानवता सर्वात मोठा धर्म आहे. परमेश्वराने आपल्याला इतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याकरता मानवाचा जन्म दिला आहे. आई-वडिलांची सेवा करणे हे आपल्या प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने पार पाडले पाहिजे. संस्काराने जीवन महान बनू शकते म्हणून जीवनात संस्कार अतिशय महत्त्वाचा असतो.प्रारंभी भास्कर महाराजांनी त्यांचे गुरु प.पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. नंतर भजन, आरती, कीर्तन झाले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती होती.गुरू आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा व प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आनंदी जीवन कसे जगावे शिकवतात. गुरू शब्दाचा अर्थच मुळात अंधार नाहीसा करणे, हा आहे. गुरू ज्ञानाचा सागर असतात. गुरूच्या कृपेनेच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ज्ञानप्राप्तीसाठी, जीवनात आत्मानंद मिळवण्यासाठी त्याला गुरूची आवश्यकता ही असतेच. गुरूशिवाय जीवन अपूर्णच आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम