शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

घोडे तो बहुत है.. बाजार मे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:50 IST

औरंगाबाद- जालना स्थानिक विधान परिषदेची यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद- जालना स्थानिक विधान परिषदेची यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे. युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी संयुत्त पत्रक काढून घोडेबाजार न करता प्रामाणिकपणे मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. या अनोख्या आवाहनाचे पडसाद रविवारी जालन्यातील बिज शीतल सीडस्च्या सभागृहात पार पडलेल्या युतीच्या बैठकीत उमटले.अनेक जि.प. सदस्य तसेच नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आम्ही प्रामाणिक पणे मतदान नेहमीच करतो, परंतु यंदा आम्हाला घोडे अर्थात खरेदीदार समजून आमचा अपमान झाल्याची भावना बोलून दाखवली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत थेट १९९८ च्या पंतप्रधान वाजपेयींचे सरकार ज्यावेळी एका मताने पडले होते. त्याची आठवण करून देत घोडे तो बहुत है बाजार मे.. लेकीन खरेदीदार नही असे म्हटल्याचे सांगून हशा पिकवला.या बैठकीत दानवे यांनी नगरसेवकांची समजूत काढतांना हा किस्सा सांगितला. तसेच जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेने जो राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला आहे, त्यात देखील लवकरात लवकर शिवसेनेने काडीमोड घ्यावा असा सूचक इशाराही बैठकीस उपस्थित राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे कटाक्ष टाकत दिला. एकूणच आजची ही बैठक युतीचे उमेदवार अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठीची व्युहरचना आखणारी ठरली. त्याच दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. आजच्या बैठकीत राज्यमंत्री खोतकरांनीही अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या मतदारांना व्हीप पाळण्याचे आवाहन केले.या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. १९ रोजी निवडणूक होत आहे. त्याामुळे अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णींकडून मतदारांच्या वैय्यक्तीक भेटींवर भर देऊन संपर्क गतीमान केला आहे.या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह जि.प. सदस्य. नगरसेवकांची उपस्थिती होती.या निवडणुकीत जालना जि.प. ६४, भोकरदन पालिका २०, जाफराबाद नगरपंचायत १९, जालना न.प. ६७, बदनापूर नगरपंचायत १९, मंठा नगरपंचायत १९, घनसावंगी नगरपंचायत १९, परतूर पालिका २३ आणि अंबड पालिका २२ असे २७२ मतदार जालना जिल्ह्यात आहेत. त्यात जालना, भोकरदन, घनसावंगी, परतूर या काँग्रेसकडे असून, उर्वरित युतीकडे आहेत.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPoliticsराजकारणRaosaheb Danweरावसाहेब दानवे