शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र कुरआन मानवी जीवनात क्रांती घडवणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:16 IST

समाजातील प्रत्येकाने पवित्र कुरआनची शिकवणी आपल्या जीवनात अंगिकारावी, असे आवाहन गुडविल एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल हफीज यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पवित्र कुरआन हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून, या ग्रंथातील शिकवण मानवी, सामाजिक जीवनामध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या आहेत. आपले जीवन सफल होण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पवित्र कुरआनची शिकवणी आपल्या जीवनात अंगिकारावी, असे आवाहन गुडविल एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल हफीज यांनी येथे केले.गुडविल एज्युकेशन सोसायटीच्यावतीने ‘आओ कुरआन समझे’ या शीर्षकावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित ३ दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अब्दुल हफीज बोलत होते. यावेळी अरेबीक भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक अब्दुल रहीम (हैदराबाद) यांची प्रमुख उपस्थिती होती.ही कुरआनवर आधारित कार्यशाळा दि. १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान पार पडली. यावेळी अब्दुल रहीम (संचालक, अन्डरस्ॅटण्ड कुरान अ‍ॅकॅडमी) यांनी उद्घाटन केले. त्यानंतर अब्दुल रहीम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या ३ दिवशीय कार्यशाळेत नमाजाचे महत्त्व आणि तो कशा पध्दतीने अदा करावा याची पध्दती नमूद केली. दररोज २ सत्रात ही कार्यशाळा घेण्यात आली. अरेबीक आणि उर्दू भाषेतील उपयुक्त पुस्तके आणि साहित्य या सत्रांच्या प्रारंभी उपस्थितांना मोफत देण्यात आली. कार्यशाळेस मुस्लिम समाजातील महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती. जालना शहरात प्रथमच या विषयावर आयोजित धार्मिक कार्यशाळेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अरेबीक भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक अब्दुल रहीम यांनी अत्यंत सोप्या पध्दतीने कुरानातील तत्त्वज्ञान उपस्थितांना समजावून सांगितले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते इक्बाल पाशा, माजी मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल्ला, समाजसेवक कामरान खान, जमात-ए-इस्लामी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा अतिया सलीम यांनी कौतुक केले. सय्यद अब्दुल मतीन हुदाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी हफीज जुबेर फारुखी, अब्दुल मुजीब, सोहेल मोहम्मदी आणि गुफरान अहेमद सिद्दीकी यांनी आपले विचार मांडले.या कार्यशाळेनंतर पाठक कॉम्प्लेक्स, मुक्तेश्वरव्दार, कचेरी रोड, येथे कुरआन सेंटरचे उद्घाटन अब्दुल गफ्फार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर अब्दुल रहीम यांनी महिला व पुरुषांना २ वेगवेगळ्या सत्रात पवित्र कुरआन शिकविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात हफीज शब्बीर अहेमद यांच्या कुरआन पठणाने झाली. अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमित आयोजित करण्यासाठी प्रयत्न करू असे हफिज यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमIslamइस्लाम