जालन्यातील अलताफ लतीफ शेख हे गेल्या वीस ते २६ वर्षांपासून साखरेपासून गाठी तयार करण्याचा व्यवसाय करतात. मोंढ्यातून साखर काही क्विंटलमध्ये आणून त्यापासून गाठी तयार केली जाते. साखरेचा पाक म्हणजेच चाचणी करून त्यापासून गाठ्यांची माळ तयार केली जाते. ही माळ साधारणपणे ११ किंवा १६ पदकांची असते. होळी सणाला एकमेकांकडे जाऊन रंगांची उधळण करण्यासोबतच साखरेची गाठी देण्याची परंपरा पूर्वापार सुरू आहे. हा गाठी उद्योग जालन्यात चांगला रूजलेला आहे. धानाबाजार भागातही गाठ्या तयार करणारे अनेक परिवार आहेत. परंतु यंदा एक मुहूर्त साधण्यासाठी थोड्या गाठ्यांची निर्मिती केली आहे. जी दरवर्षी काही क्विंटलमध्ये केली जात होती.
आज साखरेपासून तयार गाठींची किंमत ही प्रतिकिलो ५५ ते ६० रुपये किलोवर असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
कोरोनाने गोडी हिरावली
जालन्यात गाठी तयार करण्याचा मोठा व्यवसाय होळी आणि पाडव्याला होत असतो. आपण गेल्या २० वर्षांपासून या क्षेत्रात आहोत. एवढी मंदी आपण कधीच अनुभवली नव्हती. एकेकाळी संपूर्ण मराठवाड्यात जालन्यातूच गाठ्यांचा पुरवठा होत होता. ही गाठी तयार करतांना लिंबू, दुधासह अन्य रासायनिक पदार्थांचा उपयोग केला जातो. गाठीचे पदक कडक उन्हातून आलेल्यांना थंड पाण्यासोबत दिल्यास थकवा दूर होऊन एक प्रकारची एनर्जी मिळते.
अलताफ शेख, गाठी उत्पादक