शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
3
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
4
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
5
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
6
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
7
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
8
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
9
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
10
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
11
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
12
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
13
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
14
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
15
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
16
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
17
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
18
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
19
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
20
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

हायवा पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद जालना : करवा आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात गर्भाशयाचे ...

शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

जालना : करवा आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात गर्भाशयाचे आजार, गरोदर स्त्री तपासणी, वंध्यत्व निवारण, अनियमित मासिक पाळी आदी रोगांची तपासणी करण्यात आली आहे. शिबिरात १०० जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

अंतरवाली दाई येथे काळे यांचा सत्कार

जालना : घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दाई येथील विकास काळे यांनी सीएच्या अंतिम परीक्षेत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरेश काळे, मदन गोटे, बाळासाहेब बरसाले, नवनाथ लोहकरे, नारायण बरसाले, शेषराव गंधाखे, भागवत बरसाले, संभाजी बरसाले, दत्तात्रय काळे, कैलास खांडेभराड, भागवान यादव, गजानन गावंडे, गजानन काळे, नितीन बरसाले, स्वप्नील बरसाले, रामेश्वर बरसाले, लक्ष्मण बरसाले यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तालुकाध्यक्षपदी अकबर अली यांची निवड

पारडगाव : ऑल इंडिया जमियातुल कुरेशी समाजाच्या घनसावंगी तालुकाध्यक्षपदी सय्यद अकबर अली असगर अली यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष कासिम कुरेशी, सचिव याशीन कुरेशी, कोषाध्यक्ष राजेक कुरेशी, प्रसिद्धीप्रमुख नजीर कुरेशी, सहसचिव अस्लम कुरेशी, सचिवपदी ताहेर कुरेशी, संघटक नुरमिया कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

जालना : तालुक्यातील सेवली येथील रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे महेश डुमे यांनी केली आहे. सेवली येथे डीपीसीतंर्गत २०१९-२० या वर्षात विशेष अनुदान आले होते. परंतु, हे काम करताना अनियमितता केली आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी डुमे यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्पाची जालन्यात होळी

जालना : सिटू कामगार संघटनेच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प २०२१ ची होळी करण्यात आली. त्याचबरोबर आयसीडीएसच्या बजेटमध्ये कपात करण्यात आल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. यावेळी सुभाष मोहिते, प्रभाकर कुलकर्णी, कल्पना आर्दड, रेखा काकडे, राहुल हनवते, अजित पंडित आदी उपस्थित होते.

गारखेडा देवी शिवारात गाय चोरीस

भोकरदन : तालुक्यातील गारखेडा देवी येथून प्रवीण आनंदा काळे या शेतकऱ्याच्या शेतातून अज्ञात चोरट्याने पंचेचाळीस हजार रुपये किमतीची गाय चोरून नेली आहे. यासंदर्भात भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. भोकरदन शहर आणि परिसरात ग्रामीण भागात जनावरे चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. चोरट्यांना पकडून बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

निधी संकलनासाठी शोभायात्रा

रांजणी : अयोध्येत उभारण्यात येत असलेले राम मंदिर निर्माण निधी संकलनासाठी रांजणी येथे शोभायात्रा काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रा मार्गावर नागरिकांनी आपापल्या घरासमोर साफसफाई, सडा, रांगोळी काढण्यात आल्या. श्रीरामाची प्रतिमा असलेला रथ, हाती भगवे ध्वज घेतलेले युवक व टाळ-मृदंगाचा गजरात भजनी मंडळ सहभागी झाले होते. ‘जय श्रीराम’, ‘सीतापती रामचंद्र की जय’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला.

अंतरवाली दाई येथे रोहित्र नादुरूस्त

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दाई येथील रोहित्र नादुरूस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात मग्न आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून येथील रोहित्र नादुरूस्त झाल्याने पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे पिके सुकून चालली आहे. अनेकवेळा रोहित्र दुरूस्तीची मागणी करण्यात आली ; परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.